इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षात होर्मुज खाडीत तणाव आहे. होर्मुज खाडी हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्चे तेल आणि एलपीजीचे मोठे संकट आहे. त्यामध्येच भारताने मास्टर गेम खेळला, ज्याने चीनचा तणाव वाढला.
इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. युद्धात तणाव कमी व्हायचा तर तो अधिक चिघळत आहे. इराणने स्पष्टपणे अमेरिकेसोबत चर्चा करण्यास आणि एकाच टेबलावर येऊन वाटाघाटी करण्यास नकार दिला. मागच्या बैठकीमध्ये इराण आणि अमेरिका एकाच टेबलावर चर्चेकरिता आले. मात्र, काही यश मिळू शकले नाही. त्यानंतर अमेरिका अधिक आक्रमक झाली. होर्मुज खाडीत तणाव आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अमेरिकेनेही मोठी नाकेबंदी केली. यादरम्यानच तेलाच्या किमती गगणाला पोहोचत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आपली सागरी सुरक्षा रणनीती जाहीर केली आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या या रणनीतीमध्ये होर्मुज खाडीला एक प्रमुख महत्वाचे क्षेत्र म्हटले आहे. यासोबतच त्यांनी इतरही महत्वाच्या सागरी मार्गाचा उल्लेख केला. या महत्त्वाच्या मार्गांमध्ये केप ऑफ गुड होप, मोझांबिक चॅनल, बाब-अल-मंडेब, सुएझ कालवा, मलाक्का आणि सिंगापूरची सामुद्रधुनी, सुंडा सामुद्रधुनी यांचा समावेश आहे. सुंडा सामुद्रधुनीचा उल्लेख केल्याने चीनच्या पोटात गोळा उठला आहे.
मलाक्का आणि सिंगापूरच्या सामुद्रधुनीचे महत्त्व देखील यात अधोरिखित केले. ही खाडी हिंद महासागराला दक्षिण चीन मसुद्रात प्रशांत महासागराला जोडली जाते. हा मार्ग पर्शियन आखातापासून पूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिकपर्यंतचा सर्वात लहान सागरी मार्ग आहे. मात्र, भारताने महत्वाच्या समुद्री महामार्गांचा उल्लेख केल्यानंतर चीनचे टेन्शन वाढले आहे.
होर्मुजमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत हा सुंडा सामुद्रधुनीमध्ये सक्रिय झाला. ज्यामुळे चीन तणावात आहे. चीनची आता चिंता चांगलीच वाढली. भारत आता तिथे सक्रिय होत आहे. हा चीनला मोठा दणका आहे. हिंद महासागरावर चीनची बारीक नजर आहे. आता भारत सुंडा सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रीत करत आहे. भारत आणि चीनचे संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता संबंध चांगले आहेत.
अमेरिकेने भारतावर २०० टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेणारा चीन पहिला देश होता. तज्ञांच्या मते, होर्मुजच्या सामुद्रधुनीतील कोणत्याही अडथळ्याचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होतो, कारण जगातील तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गातून जातो. सध्याच्या युद्धात विविध गोष्टींवर भारत विचार करत आहे.




