बलात्काराच्या घटनेवर पोलिसांचे ‘हास्य’; देशभरात संताप; पीडितेच्या न्याय हक्काची थट्टा?

SHARE:

तामिळनाडू – पोलिस आपल्या कत्र्यव्याप्रती किती असंवैदनशील आहे, याचा एक प्रकार तामिळनाडूतून समोर आला आहे. कोयंबतूरजवळील सुलूर येथे एका 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मात्र या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित असलेले काही पोलिस अधिकारी मोठ्याने हसताना आणि खिदळताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, पीडित मुलगी 21 मे रोजी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. नंतर, जेव्हा कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, तेव्हा तिचा मृतदेह एका तलावाजवळ सापडला. पोलिसांनी 24 तासांच्या आत, मुख्य आरोपी कार्तिक आणि त्याचा साथीदार मोहन यांना अटक केली आणि त्यांच्यावर पाॅक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

या घटनेमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप उसळला असून, विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. विरोधी पक्ष, टीव्हीके सरकारला सातत्याने लक्ष्य करत असून कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहे. या दरम्यान पोलिसांचा असंवैदनशील व्यवहार समोर आला. या प्रकरणी पोलीस पत्रकार परिषद घेत असताना, उपस्थित असलेले काही अधिकारी मोठ्याने हसताना दिसले.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिला पोलीस अधिकार्यासह तीन अधिकारी दिसत आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान तिघेही मोठ्याने हसताना दिसत आहेत. त्यापैकी एक पश्चिम विभागाचे आयजी असल्याचे वृत्त आहे. अशा संवेदनशील विषयावर माध्यमांशी बोलताना अधिकार्यांच्या वागणुकीमुळे जनतेत तीव्र संताप उसळला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर लोकांनी या वागणुकीचा तीव्र निषेध करत याला पूर्णपणे असंवेदनशील म्हटले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जनतेचा संताप उफाळून आला. एवढ्या गंभीर प्रकरणात, एका निष्पाप मुलाच्या हत्येच्या प्रकरणात, पोलिस? अधिकारी कसे हसू शकतात, असा प्रश्न अनेक वापरकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तर एक वापरकत्र्याने लिहिले कि पत्रकार परिषदेदरम्यान तिघेही मोठ्याने हसत होते.एका अल्पवयीन मुलीशी संबंधित इतक्या गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत अधिकार्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव का होता, असा प्रश्न वापरकर्ते विचारत आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, आयपीएस अधिकारी इतके सुशिक्षित असूनही ते इतके असंवेदनशील कसे असू शकतात?

दुसर्या एका यूजरने लिहिले ही नीचतेची परिसीमा आहे. अत्यंत घृणास्पद, यापेक्षा नीच काहीही असू शकत नाही. या अधिकार्यामध्ये सहानुभूती किंवा कळवळीचा लवलेशही नाही. एका लहान मुलीची निर्घृणपणे हत्या झाली, आणि पोलिस अधिकारी जणू काही सहलीला आल्यासारखी हसत आहे. हे अजिबात सन्माननीय वर्तन नाही.

या प्रकरणात सामील असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत. या संपूर्ण घटनेवरून तामिळनाडू पोलिसांवर तीव्र टीका होत असून, पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी लोक करत आहेत. दुसरीकडे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होऊ लागल्यानंतर पोलीस महानिरीक्षक (पश्चिम विभाग) आर. व्ही. रम्या भारती यांच्यावर टीका होत आहे.

दरम्यान पोलीस आणि प्रशासनाने सफाई देताना स्पष्ट केले की व्हायरल झालेली ही क्लिप पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अगदी आधी काढण्यात आली होती, तरीही या बेपर्वाईमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment