पोलीस भरतीचे स्वप्न अपुरे! सराव करताना तरुणीचा खदानीत बुडून मृत्यू; संचालक व प्रशिक्षकावर गुन्हा दाखल

SHARE:

जालना – पोलीस भरतीची तयारी करणार्या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर खदानीचा संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय तरुण मुलीचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 4 जून 2026 रोजी नेहमीप्रमाणे ती पोलिस भरतीच्या सरावासाठी शहरापासून काही अंतरावर असलेल्या वळवंडा शिवारातील एका पाण्याने भरलेल्या खदानीच्या परिसरात गेली होती.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून ही धक्कादायक आणि घटना समोर आली आहे. खाकी वर्दी परिधान करून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुण मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्रीती काशीराम भाकड असे या मृत तरुण मुलीचे नाव आहे. पोलीस भरतीचा सराव करत असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. पाण्याच्या खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील रहिवासी असलेली प्रीती भाकड ही गेल्या काही काळापासून पोलीस भरतीची तयारी करत होती. दररोज पहाटे उठून धावणे, पोहणे आणि इतर शारीरिक कसरतींचा सराव करणे हा तिचा नित्यक्रम होता. 4 जून 2026 रोजी नेहमीप्रमाणे ती पोलिस भरतीच्या सरावासाठी शहरापासून काही अंतरावर असलेल्या वळवंडा शिवारातील एका पाण्याने भरलेल्या खदानीच्या परिसरात गेली होती.

सराव करत असताना अचानक तिचा पोहताना अंदाज चुकल्याने ती खदानीच्या खोल पाण्यात बुडू लागली. प्रीती भाकडला पाण्यात बुडताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांनी आरडाओरड केली. काही जणांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या खोलीमुळे आणि गाळामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. आणि प्रीती भाकडचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जालनामधील अंबड पोलीस ठाण्याच्या पथकानेे वळवंडा शिवारात घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरिकांच्या आणि पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने प्रयत्नांनंतर काही वेळाने प्रीतीचा मृतदेह खदानीबाहेर काढण्यात आला. मृतदेह तात्काळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र, तिथे उपस्थित डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले आहे. प्रीती भाकडच्या मृत्यूची घटना समजल्यामुळे अंबड शहरात हळहळ व्यक्त केली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर प्रीती भाकडच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था नसताना आणि निष्काळजीपणा केल्यामुळेच प्रीती भाकडचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

मयत तरुणीचे वडील काशीराम भाकड यांच्या तक्रारीवरून जालन्यातील अंबड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खदानीचे संचालक आणि संबंधित प्रशिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांची कायदेशीर चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जालना ग्रामीण पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment