
नागपूर – महाराष्ट्र सरकार चे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या निमित्याने विविध पक्ष व संघटना आपल्या आपल्या मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चे काढत असतात. याच पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी धडक मोर्चा आयोजित केला आहे.
स्वतंत्र विदर्भ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, जातनिहाय जनगणना, महाबोधी विहार मुक्ती, लाडक्या बहिनींच्या भत्यात वाढ, सुशिक्षित तरुणांना बेरोजगार भत्ता, घरघुती गॅस व पेट्रोल चे भाव कमी करण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी शेतकरी बँक ची स्थापना अश्या असंख्य मागणीसाठी या मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील मोर्चा ला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ शेळके, प्रदेश अध्यक्ष मो. शफी सौदागर, राष्ट्रीय नेते ऍड. चंद्रशेखर देवतळे, प्रदेश महासचिव सुरेश काळबांडे, राष्ट्रीय महासचिव राजू गाडगे, केंद्रीय सहसचिव सूरज लांडगे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उईके, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पुंडलिक मून, केंद्रीय सचिव अनिल कापसे, कैलास सोनवणे, महेंद्र तोटे, भगवान दवणे, दीपक जुमडे, डॉ. अजय सोळंकी, वैशाली जंजाळकर, अक्षय गुडदे, राहुल मोहोळ, नितीनराव, मुकेश ठेवरे, धर्मपाल खोब्रागडे, अंजुम खान, अक्षय रोहनकर, बी.जी. वानखडे, शैलेश लांडगे, वसंत लांडगे, विलास मेश्राम यांनी केले आहे.





