पाटना – देश आणि परदेशातील दीर्घ प्रवासानंतर, तेजस्वी यादव रविवारी दुपारी कुटुंबासह पाटण्याला पोहोचले. आगमनानंतर ते त्यांच्या नेहमीप्रमाणे जुन्या शैलीत दिसून आले. विधानसभा निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आणि विजय मिळवण्यासाठी प्रलोभने दिल्याचा आरोप त्यांनी केला. बिहारमध्ये लोकशाहीचा पराभव झाला तर धनशाहीचा विजय झाला, अशा शब्दात त्यांनी भाजप आणि एनडीवर कटाक्ष केला.
राजद नेते आणि आमदार तेजस्वी यादव म्हणाले कि ते म्हणाले की आम्ही सुरुवातीपासूनच सकारात्मक राजकारण करत आहोत. म्हणूनच, सरकार स्थापनेनंतर पहिल्या १०० दिवसांत आम्ही त्यांच्या धोरणांवर, निर्णयांवर आणि कार्यक्रमांवर भाष्य करणार नाही, परंतु त्यांच्या कृतींवर टीका करत राहू.
या विधानावरून स्पष्ट होते की येणार्या काळात तेजस्वी सरकारविरुद्ध अधिक आक्रमक होतील. विमानतळ परिसरात तेजस्वी म्हणाले की संपूर्ण देश म्हणत आहे की विधानसभा निवडणुकीत जनता हरली आणि व्यवस्था जिंकली. त्यांनी एनडीएवर लोकशाहीला पैशाच्या राजवटीत आणि मशनरी राजवटीत रूपांतरित केल्याचा आरोप केला. ते म्हणाले कि फसवणूक, युक्त्या आणि मशनरीद्वारे मिळालेल्या जनादेशाला जनता किती स्वीकारते हे सर्वांना माहिती आहे! या लोकांनी कपटनीतीने विजय मिळवला, असा आरोपही त्यांनी केला.
डबल-इंजिन सरकारच्या काळात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, लाचखोरी, स्थलांतर, शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा आणि सुव्यवस्थेची दुर्दशा गुपित नाही! असा हल्लाबोल त्यांनी राज्यातील डबल इंजन सरकारवर केला. ते म्हाणले कि या सरकारने आपला जाहीरनामा अंमलात आणावा अशी आमची इच्छा आहे. त्यात राज्यातील अडीच कोटी महिलांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे आणि एक कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन समाविष्ट आहे.
प्रत्येक जिल्ह्यात चार ते पाच मोठे उद्योग आणि कारखाने स्थापन करण्याचे अनेक आश्वासन आहेत. जर ते निवडणुकीपूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे १५० कोटी रुपये वाटू शकत असतील, तर सरकार स्थापन केल्यानंतर, त्यांनी नागरिकांची प्रत्येक मागणी पूर्ण केली पाहिजे. असेही ते म्हणाले.
उल्लेखनीय म्हणजे तेजस्वी यादवर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान परदेश दौऱ्यावर गेले होते. आता ते आणि लालू प्रसाद यादव देखील परतले आहेत. यानंतर आता दोघांकडूनही आरजेडी संघटनेचा सैल पाया घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू होण्याची शक्यता आहे.




