किशनगढ – इंद्रानगर परिसरात ‘सच्ची रामायण’ नावाची पुस्तक विकणार्या दोन तरूणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने या ब्राम्हाणी संघटनेने आरोप केला आहे कि या धार्मिक उन्माद पसरण्यासाठी ही पुस्तक विकली जात आहे. या पुस्तकात सीता मातेबाबत आक्षेपार्य बाबी होत्या.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आणि देवी- देवतांचा अपमान करून द्वेष पसरवण्याचा आरोप करत पुस्तक विकणार्या दोन जणांना पकडले. यानंतर मदनगंज ठाणाच्या पोलिसांनी अमजेर येथील रहिवासी युवक हेमंत कुमार आणि चंद्रकांत तंवर यांना अटक केली आणि त्यांच्याकडून सच्ची रामायण नावाची पुस्तके जब्त केली. बजरंग दलाचे नगर सहसंयोजक मनिष वाल्मिकी यांनी हेमंत कुमार आणि चंद्रकांत तंवर यांच्या विरोधात धार्मिक भावना भडकवण्यासह अन्य आरोपात गुन्हा दाखल केला.
मदनगंज ठाण्याचे पोलिस अधिकारी सुरेंद्र सिंह यांच्यानुसार, पुस्तकाचे लेखक पेरियार ई.व्ही. रामस्वामी आणि प्रकाशक ललई सिंह यादव यांचा मृत्यू झालेला आहे. आरोपी युवकांनी पुस्तक कुठून विकत घेतले, त्यांचा उद्देश्य काय होता, त्यांनी आतापर्यंत किती पुस्तक विकले, याबाबत पोलिस मागोवा घेत आहे.
माहित असावे कि ९ डिसेंबर १९६९ रोजी उत्तर प्रदेश सरकारने ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांचे इंग्रजी पुस्तक ‘रामायणः अ ट्रू रीडिंग’ आणि त्याचा हिंदी अनुवाद ‘सच्ची रामायण’ हे पुस्तक जप्त करून या पुस्तकाचे हिंदी अनुवादक आणि प्रकाशक ललाई सिंग यादव यांच्यावर खटला दाखल केला होता. नंतर उत्तर भारतातील पेरियार म्हणून ओळखले जाणारे ललाई सिंग यादव यांनी अलाहाबाद हायकोर्टात जप्तीच्या आदेशाला आव्हान दिले आणि खटला जिंकला.
यानंतर सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात जस्टिस व्ही.आर. कृष्णा अय्यर, जस्टिस पी.एन. भगवती आणि जस्टिस सय्यद मुर्तझा फजल या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने १६ सप्टेंबर १९७६ रोजी राज्य सरकारचे अपील फेटाळून लावत या प्रकरणावर एकमताने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मानवतेच्या उत्क्रांतीच्या प्रवासाचा अविभाज्य भाग मानला आणि व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीसाठी तो आवश्यक आहे, यावर भर दिला.




