नांदेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीला, धमकी देत तलवारीने हल्ला केल्याचा प्रकार

SHARE:

नांदेड – नांदेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीला, धमकी देत तलवारीने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रचार कसा करतोस, तुझी बिर्याणी करून टाकू, असे काँग्रेस उमेदवाराच्या पतीला धमकी देत जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न नांदेडमध्ये झाला आहे. नांदेडच्या प्रभाग क्रमांक १ मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर, अज्ञात इसमांनी तलवारीने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार थांबला आहे. त्यामुळे आता मतदान आणि निकालनंतरच मतदारांचा अंतिम निकाल कळणार आहे. असे असताना प्रचाराच्या शेवटचा दिवस मोठा वादळी ठरला आहे. काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर काही ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आप-आपसात भिडल्याचे बघायला मिळाले आहे.
राज्यात अशीच एक घटना नांदेडच्या प्रभाग क्रमांक १  मध्ये घडली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव, यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. तर तोंडाला रुमाल बांधून ३ लोक हातात तलवार घेऊन हल्ला करत होते. पण सुदैवाने उमेदवाराच्या पतीला लागले नाही. पोलीसांच्या माहितीनुसार चोरीच्या दृष्टीने हल्ल्याचा, प्रयत्न करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणाचा तपास, नांदेड पोलीस करत आहेत. तर हल्लेखोरांनी ’तू प्रचार कसा करतोस, खूप भाषणे ठोकतोय. तुझी बिर्याणी करून टाकू’ अशी धमकी देत हल्ला केल्याचे शिवाजी भालेराव म्हणाले आहेत.आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही काय? असे भालेराव म्हणाले आहेत.

नांदेड महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचार मंगळवारी थांबला आहे. मात्र असे असताना काही तासातच काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक १  मधील उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच ,वरिष्ठ पोलीस अधिकाऱी यांसह नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. तर या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱी यांना केली आहे. तर यावेळी बोलताना त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर भाजपच्या दोन्ही खासदारांवर टीका केली आहे. या हल्यानंतर भयभयीत झालेल्या शिवाजी भालेराव यांनी आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही काय? गुन्हेगारीवर आळा घातला जाईल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नांदेडमध्ये 3 दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

माहितीनुसार, नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक १  मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती, शिवाजी भालेराव यांच्यावर, तरोडा खुर्द भागातील त्यांच्या बेलानगर येथील निवासस्थानी, ३  दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केला. हा हल्ला नेमका कशासाठी झाला, हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही. या घटनेबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, माहिती घेत अधिक तपास करत आहे. नांदेडमध्ये ही महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वादांच्या व गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!