मुंबईत के.अण्णामलाई यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, तर अण्णामलाई यांना स्वतःच्या राज्यात जिंकता आले नाही- मुंबईकर तमिळीयन व्यक्ती सुजित नायर

SHARE:

मुंबई – मुंबईत के.अण्णामलाई यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, तर अण्णामलाई यांना स्वतःच्या राज्यात जिंकता आले नाही, असे , मुंबईत राहत असलेल्या मुंबईकर तमिळीयन व्यक्ती सुजित नायर यांनी म्हटले आहे. स्वतःच्या राज्यात के. अण्णामलाई हे स्वतः पराभूत उमेदवार आहेत, तर ते काय इथल्या मुंबईमधील तमिळींना काय शिकवणार? मुंबईकर तमिळीयन व्यक्तीने के. अण्णामलाई यांना झापले आहे.मुंबईचा ’बॉम्बे’ असा उल्लेख करत केलेल्या विधानामुळे भाजपाचा दाक्षिणात्य नेता सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच, मुंबईकर तमिळ व्यक्तीने या के. अण्णामलाई या भाजपाच्या तामिळनाडूतील नेत्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. हे अण्णामलाई स्वतःच्या राज्यात हे पराभूत उमेदवार आहेत, आणि ते काय इथल्या मुंबईतील तमिळींना शिकवितात. मुंबईकर तमिळीयन व्यक्तीने भाजपा नेते अण्णामलाई यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईवरुन केलेल्या विधानाने नव्याने वाद निर्माण झाला होता, त्याला मुंबईकर तमिळीयन व्यक्तीने प्रत्युत्तर दिले आहे. तमिळ मुंबईकरानेच त्या भाजपाच्या के. अण्णामलाई या नेत्याला झापले आहे. भाजपा नेते अशी लाज वाटत असल्याची, विधाने करतात असे मुंबईकर तमिळीयन व्यक्तीने म्हटले आहे. “बॉम्बे हे महाराष्ट्रातील शहर नसून देशतील व जगभरातील आंतरराष्ट्रीय शहर आहे,“ असे वादग्रस्त विधान केल्याने भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भारतामधील नेते के. अण्णामलाई सध्या मुंबईच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. के. अण्णामलाई यांच्या विधानामुळे मराठी विरुद्ध दक्षिण भारतीय म्हणजेच तमीळ असे गट पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीचे शीव येथील आमदार सेल्वन यांनी के. अण्णामलाई यांची बाजु मांडली आहे. मात्र त्याचवेळी मुंबईतील एका तमिळ व्यक्तीने के. अण्णामलाई यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही ,असे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. साधला आहे. के. अण्णामलाई यांना स्वतःच्या राज्यात जिंकता आले नाही अशी टीका या मुंबईकर तमिळ व्यक्तीने आपल्या फेसबुक पोस्टमधून केली आहे.मुंबईतील तमिळ लोकांनाही या विधानाची लाज वाटते आहे, असे त्या तमिळ व्यक्तीने म्हटले आहे.

भाजपाचा “के. अण्णामलाई हा माणूस तमिळ मुंबईकरांना कोणाला मतदान करायचे हे का सांगत आहे?” असा प्रश्न पोस्टच्या पहिल्याच वाक्यात राजकीय विश्लेषक अशी स्वतःची ओळख करुन देत असलेला सुजित नायर यांनी विचारला आहे. भाजपाचा नेता “अन्नामलाई यांना मुंबईत येऊन अनावश्यक, चिथावणीखोर विधाने करण्याचा काही अधिकार नव्हता. हा केवळ भाजपाचा पक्षीय राजकारणाबद्दलचा विषय नाही. यामुळे महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात कटुता निर्माण झाली आहे ,आणि मुंबईत अनेक दशकांपासून अभिमानाने आणि सन्मानाने राहत असलेल्या मुंबईकर तमिळ लोकांनाही लाज वाटत आहे,“ असे स्पष्ट मत राजकीय विश्लेषक सुजित नायर यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केले आहे.

राज्यात व देशात भाजपा या पक्षाचे नेतृत्व नाही, तर राजकीय अहंकार वाढला आहे, असे राजकीय विश्लेषक सुजित नायर यांनी म्हटले आहे. कोणत्याही राज्यातील “स्थानिक निवडणुकांवर लोकांना व्याख्यान देण्यासाठी परराज्यातील नेत्याने हे अशा प्रकारे येऊन वक्तव्य करावी, अशी अपेक्षा कोणी का करेल? तमिळ भाषिक मुंबईकरांना बाहेरून राजकीय सूचनांची आवश्यकता नाही. त्यांच्या वॉर्डात आणि त्यांच्या शहरात कोण त्यांच्या मतदानासाठी पात्र आहेत, हे ठरवण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत. अधिक महत्त्वाचे म्हणजे, अन्नामलाईंच्या नेतृत्वाखाली भाजपा त्यांच्याच राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकू शकलेली नाही. ते स्वतः सुद्धा निवडणूक हरलेले आहेत, असे असताना तामिळनाडूच्या या भाजपाच्या राजकारण्याला इतरत्र जाऊन मतदारांना सल्ला देण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे? या यामुळेच हे भाजपाचे नेतृत्व म्हणून नाही तर भाजपाचा राजकीय अहंकार म्हणून समोर येत असल्यासारखे वाटतंय,“ असे ही सुजित नायर म्हणाले आहेत.

कोणत्याही राज्यात राजकीय दादागिरीने नव्हे तर आदराने सन्मान केला पाहिजे. “मुंबई हे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. हे महाराष्ट्रातील लोकांचे आहे ,आणि येथे काम करण्यासाठी, जगण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी आलेल्या प्रत्येक भारतीयाचेही, ते तितकेच आहे. राजकीय दादागिरीने नव्हे तर, परस्पर आदराने हा समतोल साधला गेला आहे. प्रथम, आपण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला पाहिला आहे, मोठे प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांमध्ये शांतपणे हलवले गेले. आता आपल्याला अनावश्यक राजकीय हस्तक्षेप दिसतो ,ज्यामुळे सामाजिक राजकारण ,वाद विवाद वाढवण्याचा व बिघडण्याचा धोका आहे. ही सारी पद्धत फार त्रासदायक , वेदनादायक आहे,“ असे नायर यांनी म्हटले आहे.

मुंबईत आपण विरुद्ध मराठी ’ते’ अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका. महाराष्ट्रातील लोक आदरातिथ्य करणारे आणि सहिष्णु आहेत. भारताच्या कानाकोपर्यातील लोक येथे शांततेत आणि सन्मानाने राहतात, कारण हे शहर सर्वांना जागा देते. कृपया फुटीरतावादी राजकारण किंवा ’आपण’ विरुद्ध ’ते’मराठी अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका. मुंबईला श्वास घेऊ द्या आणि आम्हाला शांततेत जगु दया, राहू द्या,“ असे राजकीय विश्लेषक व एक मुंबईकर तमिळ व्यक्ती सुजित नायर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. रितेश देशमुखच्या मुलाने या सिनेमातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले आहे.