मुंबई – देशातील जनतेच्या पैशांवर प्रधानमंत्री मोदी व भाजपा सरकार, आपले मित्र अदानींचे साम्राज्य वाढवत आहत, असा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. अदानी ग्रुप अडचणीत आल्यास भारतातील अर्थव्यवस्था कोसळेल, व प्रत्येक भारतीयावर त्याचा परिणाम होईल. अदानी यांचे साम्राज्य मागच्या १० वर्षांत फक्त नरेंद्र मोदींमुळे व देशातील भाजपा सरकारमूळे उभे राहिले. अदानी यांनी जे उद्योग उभे केले ते प्रतिस्पर्ध्यांच्या कानावर बंदुकीची नळी लावून केले आहेत.
देशात अदानींकडे हा सर्व पैसा आला कोठून? देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान करून आला आहे. मराठी माणसाने मुंबईत अदानींचा पाया भक्कम करण्यासाठी मदत केली आहे. देशातील भाजपाचे व मोदींचे लाडके मित्र उद्योगपती गौतम अदानी यांनी, महाराष्ट्रासह भारत देश कसा गिळला आहे, याचे जोरदार प्रेझेंटेशन राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत दाखवले तेव्हा देश हादरला आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. आतापर्यंत राहुल गांधी दिल्लीत व उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अदानींच्या राक्षसी वृत्तीवर विरोध करत होते. राज ठाकरे यांनी अदानी यांनी व्यापलेला भारताचा व महाराष्ट्राचा नकाशा समोर आणला आहे. भारताच्या संपूर्ण नकाशाचे मालक अदानी झाले आहेत. भारताचा मोठा भूभाग आधी चीनने गिळला, व भारतांतर्गत आता गौतम अदानी यांनी मोक्याचा भूभाग व सार्वजनिक संपत्ती गिळली आहे स्पष्ट दिसते,“ असे बोलत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान करून अदानी मोठा झाला आहे, तर भारत देशात सर्व एअरपोर्ट, बंदरे, सार्वजनिक उद्योग अदानीनी ताब्यात घेतले ते, मोदी यांच्या आशीर्वादाने घेतले आहेत. हा सर्व पैसा आला कोठून? अदानी यांनी जवळपास १८ ते २० टक्के कर्ज देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतले आहे. म्हणजे हा भारत देशातील जनतेचा पैसा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान करून हे कर्ज घेतले आहे. हा अदानी समूह कधी अडचणीत आला तर, त्याचा परिणाम त्या बँकांमध्ये बचत असलेल्या, प्रत्येक भारतीय नागरिकावर होईल,“ असे शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हणाले आहेत.
येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था कोसळून पडेल, व अदानी परदेशात पळुन जातील. भारत देशातील जनतेच्या पैशांवर मोदी व देशातील भाजपा सरकार आपले मित्र अदानींचे साम्राज्य वाढवत आहेत. हा इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. राज्यातील मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीच्या विरोधात, हाच भ्रष्टाचाराचा पैसा वापरला आहे. मुंबईत धारावीपासून, इतर अनेक जमिनी ताब्यात राहाव्यात, म्हणून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न, अदानींचे लोक करत आहेत, व त्या जाळ्यात आमच्या राज्यातील काही जण फसले आहेत. गौतम अदानी यांनी मराठी एकजुटीचा पराभव होण्यासाठी, पूर्ण ताकद मुंबईत लावली आहे. तर राज्यात भाजपला सत्ता मिळावी व मुंबई आपल्या ताब्यात यावी, हे अदानींचे स्वप्न आहे. राज्यातील एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मराठी माणसाने, मुंबईत अदानींचा पाया भक्कम करण्यासाठी, आपला स्वाभिमान दिल्लीच्या दारात गहाण ठेवला आहे, हे इतिहासात नोंदले जाईल. राज्यात सगळीकडे भ्रष्टाचार वाढला आहे, भाजपा सरकारच्या काळात भारत देशात व राज्यात सगळीकडे अंदाधुंद मनमानी कारभार वाढला आहे, असे ठाकरेगट शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.





