पूणे – राज्य सरकारकडून ज्या अनेक घोषणा होतात, त्या अजूनपर्यंत अमलात आलेल्या नाही. त्या योजना अंमलात आणण्याकरीता आपल्याला सर्वांना संघटनेत आलं पाहिजे. असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य नाना खलसे यांनी रविवारी उद्घाटन प्रसंगी केलं. ते पुणे येथे लहूजी क्रांती मोर्चा द्वारे आयोजित मांग, गारूडी जागृती परिषदेत बोलत होते.
नाना खलसे पुढे म्हणाले कि मातंग समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी मंचावर उपस्थित आहेत. हे सर्व पदाधिकारी मातंग समाजाच्या अनेक पोटजातीमधील तळागळाच्या कार्यकर्त्यांना, तरूण पिढीला, आपल्या राज्याच्या आणि देशाची लोकशाही काय आहे, आणि आपण महाराष्ट्र आणि पूणे जिल्हयामध्ये आपल्याला तरूण पिढीला अनेक मान्यवर आणि नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वारंवार सांगत आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्याला सांगितलं आहे कि ‘शिका, संगठित व्हा आणि मग संघर्ष करा! तो संघर्ष आपल्याला कुठला करायचा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले कि केंद्राच्या आणि राज्यांच्या ज्या योजना आहेत, त्या योजना आपण तळागळातील लोकांपर्यंत आणि तरूण पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे. हा संघर्ष आपल्याला करायचा आहे. आपण सघर्ष केला नाही तर येणार्या नवीन पिढीला काहीच मिळणार नाही. म्हणून मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी आहेत, मी त्यांना वतीनं विनंती करेन कि ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत, किंवा महानगर पालिकेच्या ज्या योजना आहेत, ग्रामीण भागात जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत, या सर्व योजना आपल्या समाजातील आणि तळागळातील पिढीपर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी करावं.
नाना खलसे म्हणाले कि आज आपल्याला शासनाच्या ज्या अनेक प्रकारच्या योजना आहेत, त्या आपल्याला माहित नाही. मी कांबळे सरांना सांगितलं कि अ,ब,क हे काय आहे? त्या माध्यमातून राज्य सरकारकडून काय मिळणार आहे, त्यांच्या भाषणामध्ये ते सांगणार आहेत. ते आपण समजून घेतलं तर खर्या अर्थानं सरकारच्या वतीनं आपल्या मातंग समाजाला न्याय मिळाला म्हणून समजा.
राज्य सरकारकडून ज्या अनेक घोषणा होतात, त्या अजूनपर्यंत अमलात आलेल्या नाही. त्या योजना अंमलात आणण्याकरीता आपल्याला सर्वांना संघटनेत आलं पाहिजे. मंचावर अनेक जातीपातीचे लोक आहेत, त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. जर आपण अशा कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलं तर पुढं ताकतीनं भांडता येईल. अन्यथा शासन विचार करते कि हे लोक दोन चार संख्यने येतात, मोर्चा काढतात, निवेदन देतात आणि निघून जातात, असं न होता मंचावर जे बसलेले आहेत, हे सर्व आपले पदाधिकारी आहेत, ते आपल्या हिताचं काम करतात, हे समजून आपण त्यांच्याकरीता, त्यांनी जर आपल्याला कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं तर आपण आपल्या हातातलं काम सोडून त्या कार्यक्रमाला आपली जबाबदारी समजून पोहोचलं पाहिजे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मातंग समाज आहे. सर्वांनी आलं तर आपली ताकद वाढन. आपली ताकत वाढली कि नक्कीच तरूण पिढीला न्याय मिळेल. यासाठी आपल्याला मंचावरील सर्व पदाधिकार्यांचं ऐकलं पाहिजे, असही नाना खलसे म्हणाले.





