नवी दिल्ली – देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचे मंगळवारी २७ जानेवारीला देशव्यापी आंदोलन होणार आहे. देशभरात ५ दिवसांचा आठवडा लागू करा, या मागणीसाठी देशातील बँक कर्मचार्यांचे मंगळवारी देशव्यापी आंदोलन होणार आहे. देशातील सरकारच्या विरोधात देशभरात बँक कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन होणार आहे.
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा ५ दिवसाचा आठवडा करावा या मागणीसाठी देशव्यापी मोर्चा मंगळवारी २७ जानेवारी रोजी देशभरात मोर्चा काढला जाणार आहे. या संपादिवशी देशभरात बँक कर्मचारी एकत्रित जमून देशातील सरकारच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन मोर्चा काढणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी यांनी दिली आहे.
देशात २०१० ला बँकर्सनी ५ दिवसांचा आठवडा ही मागणी तत्वतः मान्य करत असताना २ शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून उर्वरित २ शनिवार पूर्ण सुट्टी लागू केली आहे. त्यानंतर ११ व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी तत्वतः मान्य करत उर्वरित २ दिवसांच्या सुट्टीचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे मान्य केले आहे. १२ व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी मान्य करत शिफारशी सह अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे सांगितले. तसा तो प्रस्ताव सरकारला सादर केला. पण २ वर्षांपासून सरकारने अंमलबजावणी केली नाही. अद्यापही या संदर्भात कोणतीही, ठोस भूमिका घेतलेली नाही. यामुळे बँक कर्मचाऱी वर्गात संताप व्यक्त करत आहेत.
देशातील सरकार एकीकडे डिजिटल इंडिया, डिजिटल बँकिंगचे मोठे दावे करते. पण दुसरीकडे बँक कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा लागू करावयाचा म्हटले की, ग्राहकांना पुढे करून तो, निर्णय घेण्याचे टाळते. देशातील सरकार एलआयसी, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबी या सर्वांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करते. पण देशातील बँक कर्मचार्यांना लागू करत नाही.
यासाठी देशातील युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने देशात २७ जानेवारीला २०२६ ला एक दिवसीय देशव्यापी आंदोलन करणार आहे, असे म्हटले आहे. देशातील बँक कर्मचारी यांच्या मागण्यांकडे देशातील सरकार दुर्लक्ष करत आहे, त्यामूळे देशातील बँक कर्मचारी वर्गानी देशभरात भारत सरकारच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यासाठी तयारी केली आहे.




