अचलपूर – महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्तेसाठी अनपेक्षित युती होताना दिसत आहे, तर अमरावतीत भाजपा व एमआयएम हे दोन विचारांचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय सत्तास्थापनेसाठी युती करुन पदही दिले आहे. महाराष्ट्रात अमरावतीमध्ये भाजपा आणि एमआयएमने युती केली असून दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. अमरावतीमध्ये अचलपूर नगर परिषदेत, भाजपा आणि एमआयएमची युती झाली आहे, तर सभापती बनवत सत्ता ही स्थापन केली आहे. एमआयएमच्या ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या २ आणि ३ अपक्ष नगरसेवकांचा गट एकत्र झाला आहे.
महाराष्ट्रात सत्तेसाठी युती होत आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत, सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएमने एकत्र येत, सभापती बनवत सत्ता स्थापन केलेली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर देशात स्वःताला हिंदुत्ववादी म्हणणार्या, भाजपवर राज्यातील विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे.
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत, भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. तर अचलपूर नगर परिषदेच्या समिती सभापती पदासाठी, भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे, सभापती पद मिळाले आहे. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट हा, भाजपासोबत गेल्याने अचलपूर मध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आली असल्याने राजकीय चर्चा होत आहे.
अमरावतीच्या अचलपूर मध्ये सत्तास्थापनेत, भाजपने एमआयएम सोबत युती केली आहे. मात्र याविषयी भाजपचे अचलपूरचे आमदार यांना, विश्वासात घेतले नसल्याचे आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणार, असल्याचेही आमदार प्रवीण तायडे यांनी म्हटले आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मला प्रभाग क्रमांक एक ची जबाबदारी दिली होती. त्यामुळे मी महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो. मी हिंदुत्ववादी विचारसरणीचा आमदार आहे, आमचा पक्षही हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. त्यामुळे मी असे कधीही करू शकत नाही. मात्र अचलपुरात आमचे चार गट आहेत, मात्र आता या संपूर्ण प्रकारावर, वरिष्ठ काय निर्णय घेतात तो, निर्णय आम्हाला मान्य असेल,“ असेही अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे म्हणाले आहेत.




