नेल्लोर – आंध्रप्रदेशात खासगी बसला आग लागल्याने, ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर धावत्या बसला आग लागल्याने हा अपधात झालेला आहे. टायर फुटल्याने बस डिव्हायडर ओलांडून कंटेनरवर आदळली आहे. मध्यरात्री पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोरहून तेलंगणातील, हैदराबादकडे जात असताना बसचा उजव्या बाजूचा टायर फुटला, आणि हा अपघात झाला. आग लागल्याने ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कंटेनरने लॉरीला धडक दिल्यानंतर, खासगी बसला आग लागली. त्यांनतर बसचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. आंध्र प्रदेशातील नंद्याल जिल्ह्यात पहाटे हा अपघात झाला. कंटेनर लॉरीला धडक दिल्यानंतर, खासगी बसला आग लागून ३ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री १.३० वाजता झाला आहे.
आंध्र प्रदेशातील नेल्लोरहून तेलंगणातील हैदराबादकडे जाणार्या बसचा, उजव्या बाजूचा टायर फुटला. टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे बस रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर लॉरीवर आदळली. त्या लॉरीमध्ये मोटारसायकली भरलेल्या होत्या. धडक इतकी जोरदार होती की, बस आणि ट्रक दोघांना आग लागली. परिसरातील रहिवासी, बसचा क्लिनर आणि कंडक्टर यांनी खिडक्या तोडून, आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात, वाहतूक कोंडी झाली होती.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी आग विझवण्यासाठी आणि अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी , प्रयत्न केले. या अपघातामुळे अनेक तास वाहतुकीत मोठी, अडचण निर्माण झाली होती. अग्निशमन दलाने आग विझवण्यात यश मिळवले, परंतु दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली होती. बस चालक, ट्रक चालक आणि क्लिनर यांचा गंभीर दुखापत आणि भाजल्यामुळे मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. बसमधील ३६ प्रवाशांपैकी ४ जणांना फ्रॅक्चर झाले असून, त्यांना नंद्याल जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे हा प्राणघातक अपघात झाला ,आणि त्यानंतर आग लागली. या घटनेमुळे वाहन सुरक्षा, रात्रीच्या प्रवासातील धोके आणि खाजगी लांब पल्ल्याच्या बसेससाठी,कडक तपासणीची गरज आहे. या अपघात प्रकरणात आंध्रप्रदेश पोलिस अधिक तपास करत आहेत. या अपघातानंतर, राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, पुन्हा उपस्थित झाला आहे.




