बिहार – लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी बिहारच्या दरभंगा येथील कथाकार श्रवण दासजी महाराजला अटक केली. हा कथाकार पीडित मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात केला. कथाकार श्रवण दास महाराजविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.
श्रवण दास महाराजने अल्पवयीन मुलीचे वर्षभर लैंगिक शोषण केले. नंतर लग्न करण्यास नकार दिला. पीडित मुलगी गर्भवती राहित्यानंतर त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात केला. पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी श्रवण दाजी महाराजविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आरोपी कथाकार श्रवण दास महाराज अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत आल्यावर तिचे कपडे काढायला सांगत असे.
त्यानंतर तो तिच्यासोबत भयंकर कृत्य करायचा. त्याने पीडितेचा गर्भपात केला. तसंच तिला शांत करण्यासाठी त्याने एका बंद खोलीमध्ये लग्न देखील केले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कथाकार श्रवण दासजी महाराजने तो खोटा असल्याचे सांगितले आणि लग्न केलं नसल्याचे सांगितले. कथाकाराने व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दरभंगाचे एसएसपी जगनाथ रेड्डी यांनी सांगितले की उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने ही अटक केली आहे. ते म्हणाले कि महिला पोलिस स्टेशन, लहरियासराय पोलिस स्टेशन आणि जवळच्या इतर पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला हाऊसिंग बोर्ड कॉलनीतून अटक केली. महिला पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन बराच काळ लैंगिक शोषण केले आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.
त्यांनी पुढे सांगितले की कथाकाराचा सहकारी आणि गुरु मानल्या जाणाऱ्या मौनी बाबाच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे. मौनी बाबा सध्या फरार आहे. दरभंगा एसएसपींनी पुढे सांगितले की आरोपीची कसून चौकशी केली जात आहे आणि या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, राजद नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारवर जोरदार टीका केली आणि राज्यभरातील महिला आणि अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. त्यांनी प्रशासन गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला आणि मधेपुरा, खगरिया आणि पाटणा येथे महिलांवरील अलीकडील घृणास्पद घटनांवर मुख्यमंत्र्यांच्या मौनावर टीका केली.
एक्सवरील एका पोस्टमध्ये यादव यांनी लिहिले की भ्रष्ट व्यवस्था आणि मशीन-निर्मित डबल-इंजिन एनडीए सरकार अत्याचारी, भ्रष्ट व्यक्ती, गुन्हेगार आणि बलात्कार्यांसाठी एक विश्वासार्ह शस्त्र बनले आहे. मतांच्या खरेदीतून स्थापन झालेले बिहारचे असंवेदनशील नितीश कुमार सरकार राज्यभरातील अल्पवयीन मुली, विद्यार्थी, मुली आणि महिलांवर अत्याचार करत आहे. हे अत्याचार सत्तेत असलेल्यांकडून होत असल्याने, सरकारमधील प्रमुख व्यक्ती या भयानक घटनांवर ढोंगी मौन बाळगत आहेत आणि संत असल्याचे भासवत आहेत. या घटना दर्शवितात की हे सरकार निर्दयी, क्रूर आणि अमानवी बनले आहे. यादव यांनी बिहार पोलिसांवर महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा आरोप केला.




