महाड निवडणुकीतील मारहाण प्रकरणात, शिंदेगट शिवसेनेच्या आमदारपुत्राला अटक

SHARE:

महाड – महाड निवडणुकीतील मारहाण प्रकरणात, शिंदेगट शिवसेनेच्या आमदारपुत्राला अटक करण्यात आली आहे. आता कोकणातील एका बड्या नेत्याच्या पुत्राला अटक, महाड पोलिसांनी अटक केली आहे. कारण तो आमदारपुत्र २४ दिवसांपासून फरार झाला होता. जवळपास २४ दिवस बेपत्ता राहिल्यानंतर, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शरण येण्याचा, कालावधी संपण्याच्या काही मिनिटे आधी हा, कोकणातील आमदार पुत्र पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक करुन, न्यायालयातही दाखल करण्यात आले आहे. आमदारपुत्र स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. कोर्टातही हजर करण्यात आले आहे.

महाड नगरपरिषद निवडणुकीत, झालेल्या मारहाण प्रकरणात, राज्याच्या कॅबिनेटमधील मंत्री भरत गोगावले शिवसेना शिंदे गट यांचे पुत्र, विकास गोगावले पोलिसांना शरण आले आहेत. विकास गोगावले यांना, पोलिसांनी अटक करून घेऊन, कोर्टासमोर हजर केले आहे. २०२५ च्या डिसेंबर महिन्यामध्ये विकास गोगावले आणि त्यांच्या सहकाऱी लोकांनी, राष्ट्रवादीच्या नेत्याला मारहाण केली होती. या प्रकरणावरुन, कोर्टाने विकास गोगावलेंना अटक का झाली नाही? असे प्रश्न विचारल्यावर पोलिसांनी विकास गोगावलेंचा शोध सुरु केला होता. आता तो शरण आला आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये महाड नगरपरिषद निवडणुकीच्या काळात विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनसीपी नेते सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकावर मारहाण केल्याचा आरोप आहे. विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड केली. या मारहाणीत विकास गोगावले यांनी रिव्हॉल्वर दाखवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. महाड पोलिस ठाण्यात विकास गोगावले, त्यांचा पुतण्या महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा पुत्र आणि एनसीपी नेते श्रीयांश जगताप यांच्यासह, एकूण २९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. मारहाण, हिंसाचार आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर विकास गोगावले २४ दिवस बेपत्ता होते. त्यांनी माणगाव न्यायालयात दोनदा आणि मुंबई न्यायालयात एकदा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचे सर्व फेटाळण्यात आले. मुंबई न्यायालयाने सुनावणीदरम्यान थेट राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सरकारला जबाबदार धरले. मंत्रीपुत्राला अटक होत नसल्याचा संदर्भ देत न्यायालयाने भाजपा सरकारवर प्रश्न उपस्थित केला. मुंबई उच्च न्यायालयानेही विकास गोगावलेंचा जामीन फेटाळला, आणि त्यांना २३ जानेवारी २०२६ रोजी महाड पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले. मुदत संपण्यास तासभर शिल्लक असताना विकास गोगावले पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, कोर्टात महाअधिवक्तयांसमोर, विकास गोगावलेंसह या टोळीतील इतर आरोपी शरण आले आहेत, असे महाड पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणात अधिक तपास महाड पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा