आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी अमेझॉन कंपनी, १६ हजार कामगारांना नोकरीवरून काढणार 

SHARE:

नवी दिल्ली – आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी अमेझॉन कंपनी, १६ हजार कामगारांना नोकरीवरून काढणार आहे. आयटी सेक्टरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर २०२६ मध्ये जगभरातील मागील ३० वर्षातील सर्वात मोठी अमेझॉन आयटी कंपनीत मोठी कर्मचारी कपात होणार आहे. तर जगप्रसिद्ध कंपनी ३० हजार कर्मचाऱी वर्गाला कामावरुन काढणार आहे. तर पहिल्या टप्प्यांमध्ये १६,००० लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

 

२०२६ या वर्षात मोठी आयटी कंपनी असलेली अमेझॉन आयटी कंपनीचे ३० हजार लोकांना कामावरून काढण्याचा प्लॅन आहे. जगभरात ही आयटी सेक्टरसह अनेक कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली आहे. तर जगभरातील लाखो लोकांनी आपली नोकरी गमावली आहे. २०२६ मध्ये अशाच प्रकारे जगभरातील काही मोठ्या आयटी कंपनीमध्ये, मोठी कर्मचारी कपात होणार आहे. अमेझॉन या जगप्रसिद्ध आयटी कंपनीने ही सर्वात मोठी कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार कॉर्पोरेट कर्मचारी असलेल्या अमेझॉन आयटी कंपनीत ३० हजार कामगार कमी करण्याची कंपनीचे प्लानिंग आहे. तर पहिल्या टप्प्यांत अंदाजे १६ हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकले जाणार आहे, अशी कंपनी प्रशासनाने माहिती दिली आहे.

 

अमेझॉन आयटी कंपनीने यापूर्वीही ऑक्टोबर २०२५ मध्ये ३०,००० कामगार काढून टाकण्याची योजना जाहीर केली होती. आता, दुसऱ्या टप्प्यात अंदाजे १६,००० कर्मचार्यांना कामावरुन काढुन टाकण्यात येणार आहे. तर यापूर्वी, २०२२-२३ मध्ये २७,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर झालेल्या नोकऱ्या कपातीचा हा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यात रिटेल सर्व्हिसेस, प्राइम व्हिडिओ यांचा समावेश आहे. विभाग कंपनीच्या नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करतो. अमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी जून २०२५ मध्ये नोकऱ्या कमी करण्याचे, आणि कामगारांना कामावरून काढून टाकण्याची माहिती दिली होती. आता त्यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्यापक होत असल्याने, कमी लोकांची आवश्यकता असणे आहे. त्यांनी असेही सांगितले की, व्यवस्थापकीय स्तरावर लोकांचे व्यवस्थापन करणे, अधिकाधिक कठीण होत चालले आहे.

 

मागील ३० वर्षातील सर्वात मोठी कर्मचारी कपात ही जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या या अमेझॉन आयटी कंपनीत होणार आहे. अमेझॉनच्या मागील ३० वर्षांच्या इतिहासातील, ही सर्वात मोठी कामगार कपात आहे. यापूर्वी, २०२२ मध्ये, याच आयटी अमेझॉन कंपनीने २७,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ९० दिवसांसाठी पगारावर राहण्याचे, सांगण्यात आले होते, या काळात ते दुसर्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करू शकतात, किंवा नवीन नोकरी शोधू शकतात. आता ९० दिवसांचा हा कालावधी सोमवारी संपत आहे. म्हणून जगातील सर्वात मोठी अमेझॉन आयटी कंपनी आता मोठी कर्मचारी कपात करणार आहे, असे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा