चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युती होणार; राजकीय हालचालिंना वेग

SHARE:

चंद्रपूर – महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी, ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युती होणार आहे. ठाकरे सेनेच्या त्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. १० नगरसेवक मुंबईत आले आहेत. तर विदर्भाच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. ठाकरे सेनेने आता ठोस भूमिका घेतली आहे. दहा नगरसेवकांसह प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेसाठी नवी आघाडी स्थापन झाली आहे.

 

चंद्रपूर महापालिका सत्ता स्थापनेसाठी नवीन घडामोडी घडत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार असे १० नगरसेवक मुंबईकडे जाणार आहेत. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची या १० नगरसेवकांनी भेट घेतली. तसेच चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याची माहिती दिली. हे सर्व नगरसेवक मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाबाबत, कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे सर्व १० नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.

 

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने, वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत एकूण ८ नगरसेवक निवडून आणले होते. यामध्ये उबाठाचे ६ तर वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक आहेत. या अधिकृत ८ नगरसेवकांच्या गटाने काँग्रेसच्या २ बंडखोर नगरसेवकांना आपल्या बाजूला घेत १० संख्या केली आहे. हे सर्व १० नगरसेवक सध्या अकोल्यात आहेत. हे नगरसेवक मुंबईत उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. चंद्रपूर मनपात महापौर पदावर उबाठा ठाम असल्यामुळे ,भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची अडचण वाढली आहे.

 

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढला आहे. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. कारण खासदार प्रतिभा धानोकर यांनी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांना सोबत घेत, चंद्रपूर आयुक्त कार्यालयात वेगळी गट नोंदणी केली आहे. यानंतर वडेट्टीवारांच्या गटानंही स्वतःच्या नरसेवकांचे निवेदन सादर केले आहे. राज्यातील काही महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी, विदर्भाच्या राजकारणात नवीन बदल होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या राजकारणात सत्ता स्थापनेसाठी सध्या ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीने नवीन यूती केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा