मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांची १८०० कोटींची मालमत्ता जप्त; अंमलाबजावणी संचालनालयाची मोठी कार्यवाही

SHARE:

नवी दिल्ली – मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांची १८०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध, मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून, १८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी जप्त केली आहे.

या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य आता अंदाजे १२ हजार कोटी रुपये झाले आहेत. ही कारवाई रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, येस बँक घोटाळा तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड संबंधित फसवणुकीशी संबंधित आहे.

नवीन जप्तींमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे बीएसईएस यमुना पॉवर, बीएसईएस राजधानी पॉवर आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमधील शेअरहोल्डिंगचा समावेश आहे. व्हॅल्यू कॉर्प फायनान्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड यांच्याकडे असलेल्या १४८ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि १४३ कोटी रुपयांच्या मिळकती जप्त केल्या आहेत. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अंगराई सेथुरामन यांच्या नावावर असलेले एक निवासी व दुसरे वरिष्ठ कर्मचारी पुनीत गर्ग यांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड जप्त केले आहेत. एकूण १,८८५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, असे ईडीने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा