रायगड – राष्ट्रवादी व शिवसेना संघर्ष वाढला आहे, तर राष्ट्रवादीतून शिंदे गट शिवसेनेत गेलेले ७ नगरसेवक अपात्र ठरवण्यात आले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱी यांच्या आदेशामुळे वाद वाढला आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्षात म्हसळ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचा राजकीय बळी गेला आहे.
पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, ७ नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश काढले आहेत. नगरसेवक कमल जाधव, मेहजबिन दळवी, असहल कादिरी, फारहीन बशारत , सुमय्या आमदानी, सारा म्हसलाई आणि शाहिद जंजिरकर यांच्यावर कडक कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
कडक कारवाई झालेल्या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्याचे, उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ७ नगर सेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता.
या सर्वांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून, त्यांना अपात्र ठरवावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.





