रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू ची थेट फायनलमध्ये धडक! मुंबई बाहेर…? WPL प्लेऑफसाठी उरलेल्या ४ संघांचे गणित काय?,

SHARE:

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू (RCB)- संघाने गुरुवारी (२९ जानेवारी) वडोदरा येथे झालेल्या विमेन्स प्रीमियर लीग २०२६ (WPL २०२६ ) च्या लीग टप्प्यातील १८व्या सामन्यात यूपी वॉरियर्स (UPW) संघाचा आठ विकेट्सने पराभव करून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. हा आरसीबीचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना होता. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावल्यामुळे स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ थेट फायनल खेळणार आहे.

आरसीबीने आठ सामन्यांत सहा विजय मिळवत १२  गुणांची कमाई केली आहे. आता उर्वरित कोणताही संघ या गुणसंख्येपर्यंत पोहोचू शकत नाही. लीग टप्प्यात अजून दोन सामने शिल्लक असताना गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स हे चारही संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत.

मुंबई इंडियन्सचा सामना शुक्रवारी (३० जानेवारी) गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे, तर यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ रविवारी (१ फेब्रुवारी) आमनेसामने येणार आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल आणि त्यातील विजेता अंतिम फेरीत आरसीबीला भिडेल.

आता जाणून घेऊया गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे समीकरण —

गुजरात जायंट्स : जर गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला, तर ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मात्र, जर गुजरातला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला, तर त्यांना दुसऱ्या संघांवर अवलंबून राहावे लागेल. ज्यामध्ये यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटलचा पराभव करावा अशी प्रार्थना करावी लागेल

मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर विजय मिळवला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. पण जर त्यांचा पराभव झाला, तर यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा विजय फार मोठ्या फरकाने होऊ नये, अशी त्यांना अपेक्षा ठेवावी लागेल.

दिल्ली कॅपिटल्स : दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा पराभव केल्यास, मुंबई इंडियन्स–गुजरात जायंट्स या सामन्याचा निकाल काहीही असो, दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचेल. मात्र, पराभव झाल्यास दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल.

यूपी वॉरियर्स : यूपी वॉरियर्सला दिल्ली कॅपिटल्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, त्यांचा नेट रनरेट किमान दोन संघांपेक्षा चांगला होईल, अशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!