तामिळनाडू – राज्याच्या भ्रष्टाचारात सहभागी असलेले लोक भाजपासोबत आहेत, असा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी भाजपावर आरोप केला आहे. तामिळनाडू निवडणुकात ’भाजपाने एआयएडीएमकेला वॉशिंग मशीनमध्ये धुवून टाकले आहे, आणि क्लीनचीट दिली आहे, असे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी भाजपावर टीका केली आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी भाजपवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. आणि आरोप केला की, त्यांनी राज्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या एआयएडीएमकेला त्यांच्या पक्षात सामील करून घेतले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, तामिळनाडू राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेला त्यांचा मित्र पक्ष, अण्णाद्रमुक, त्यांच्या भाजपा पक्षात कसा काय चालतोय? आमच्यावरील सर्व आरोप काल्पनिक आहेत, असे स्टॅलिन म्हणाले आहेत.
स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, ज्यांना तामिळनाडू राज्याचाचा विकास पचवता येत नाही, विकास झालेला बघवत नाही, तो भाजपा पक्ष आणि अण्णाद्रमुक, ते राज्यात सोशल मीडियावर खोटेपणा पसरवतात. “आमच्यावरील सर्व आरोप काल्पनिक आहेत. पहिला राजकीय घराणेशाहीचा आहे. मी आधीच त्यावर उत्तर दिले आहे. राजकारणात प्रवेश करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु यशस्वी होण्यासाठी, जनतेसमोर उभे राहणे, त्यांचा विश्वास जिंकणे आणि मते मिळवणे आवश्यक आहे. भाजपा पक्ष व अण्णाद्रमुक यांनी हे आरोप अशा लोकांनी केले आहेत जे , तामिळनाडू राज्याच्या जमिनीवर आपला सामना करू शकत नाहीत.
आज तामिळनाडू राज्यात भ्रष्टाचारात सहभागी असलेले लोक भाजपसोबत आहेत, असे स्टॅलिन म्हणाले आहे. त्यांनी आमच्यावर केलेला आरोप म्हणजे “भ्रष्टाचार“ आतापर्यंत आमच्यावर एकही आरोप कोणी सिद्ध केला आहे का? स्टॅलिन म्हणाले, “आता जे भाजपासोबत आहेत तेच प्रत्यक्षात भ्रष्टाचारात सहभागी आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अण्णा द्रमुक पक्ष दोषी ठरवला आहे. भाजपा पक्षाने त्यांच्याशी युती नसताना त्यांच्यावर किती आरोप केले? आता तुम्ही ते तुमच्या भाजपा पक्षामध्ये आहेत, असे स्टॅलिन म्हणाले आहेत.




