एका वर्षात अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करणार्या २३ हजार ८३० भारतीयांना अटक

SHARE:

नवी दिल्ली – एका वर्षात अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करणार्या, २३ हजार ८३० भारतीयांना अटक करण्यात आलेली आहे. अमेरिकेत मागील वर्षात दररोज ६५ भारतीयांना अटक करण्यात आली आहे. एका वर्षात २३,८३० भारतीय लोकांना अटक केली आहे. तर तुर्की-दुबई मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याचा ट्रेंड वाढला आहे. गेल्या वर्षी गैरमार्गाने अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांना अटक करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, यूएस बॉर्डर आणि कस्टम्सने एकूण २३,८३० भारतीयांना अटक केली आहे.

अमेरिकेन गुप्तचर विभागाच्या मते, भारतीय लोकांची गैरमार्गाने प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, परंतु ती पूर्णपणे थांबलेली नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कालावधीमध्ये २०२४  मध्ये एकूण ८५,११९ भारतीयांना अटक करण्यात आली. अमेरिकेत प्रवेश करणारे सर्व भारतीय एकटेच होते. एकाही भारतीयाला कुटुंबासह अटक करण्यात आली नाही. २०२४ मध्ये अटक केलेल्या भारतीयांपैकी अंदाजे २० हजार भारतीय त्यांच्या भावांसह, पत्नींसह किंवा मुलांसह अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करत होते. कॅनडा आणि मेक्सिको सीमेऐवजी, आता तुर्की-दुबई मार्गाने अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

२०२५ मध्ये, कॅनडाच्या सीमेवर ६,९६८ भारतीयांना अटक करण्यात आली, तर १,५४३ जणांना मेक्सिको सीमेवर अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या भारतीयांपैकी सर्वाधिक १५,३१९ जण इतर अमेरिकतील शहरांमधून आले होते. तुर्की-दुबई मार्गाने विमानाने अमेरिकेत प्रवेश मिळतो. बहुतेक घटनांमध्ये भारतीय सुट्टीच्या व्हिसावर अमेरिकेत प्रवेश करतात आणि नंतर त्यांच्या सुट्टीच्या व्हिसाचा कालावधी संपलेला आहे. २०२५ मध्ये अमेरिकेतून एकूण ३,२५२  भारतीयांना हद्दपार करण्यात आले. २०२९ नंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. 16 वर्षांत 18,882 जणांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. भारतातून चोरीचा मार्ग हा दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेला जातो, परंतु या मार्गाने घनदाट जंगले, पर्वत, नद्या आणि वाळवंट ओलांडावे लागतात.

अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक पोलिसांसमोर भारतीय शरण जातात. त्यानंतर त्याला “इमिग्रेशन कॅम्प“ नावाच्या तुरुंगात टाकले जाते. तुरुंगातून सुटका करण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली जाते. एजंट किंवा एजंटचा नातेवाईक खर्च उचलतो. वकील त्याच्या युक्तिवादाद्वारे भारतीयाला अमेरिकेत राहण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयाला पटवून देतो. त्यानंतर, भारतीयाला तुरुंगातून सोडले जाते. भारतीयाला अमेरिकेवर ओझे बनू नये म्हणून, अमेरिकेत त्याला कमाई करण्याची आणि जगण्याची संधी दिली जाते.

भारतीय लोक चांगल्या संधींसाठी भारत सोडण्याचा विचार करतात. परंतु शिक्षणाच्या अभावामुळे किंवा इतर कारणांमुळे बरेच लोक कायदेशीररित्या असे करू शकत नाहीत. अनेक एजंट भारतीयांना श्रीमंत होण्याचे खोटे स्वप्न दाखवून, त्यांना अमेरिकेत आणून यश मिळवून देण्याचे आश्वासन देतात. अशा प्रकारे भारतीय चोरीच्या मार्गाने अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामूळे मागील वर्षात आतापर्यत अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश करत असलेल्या, २३ हजार ८३० भारतीय लोकांना अमेरिका प्रशासनाकडून अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा