जगभरात २०५० पर्यत भारत सर्वात जास्त उष्णतेचा सामना करणारा देश ठरणार; ऑक्सफर्ड विद्यापीठ अहवालातून निष्पन्न

SHARE:

नवी दिल्ली – जगभरात २०५०पर्यत भारत सर्वात जास्त उष्णतेचा सामना करणारा देश ठरणार आहे, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे. २०५० पर्यंत अति उष्णतेचा सामना करणारी लोकसंख्या दुप्पट होणार आहे. भारत सर्वात जास्त उष्ण तापमानाच्या प्रभावित देशांमध्ये आहे, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, २०५० पर्यत ३.८ अब्ज लोक, जे जगातील लोकसंख्येच्या अंदाजे ४१  टक्के आहेत, ते धोकादायक उष्णतेच्या परिस्थितीला सामोरे जातील, २०१०  मध्ये १.५४  अब्ज जे २३ टक्के होते. या परिस्थितीत, भारत सर्वात जास्त उष्ण तापमानाच्या प्रभावित देशांमध्ये असणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की, जीवाश्म इंधनाच्या सतत वापरामुळे, २०१० च्या पातळीच्या तुलनेत २०५० पर्यंत अति उष्णतेच्या संपर्कात येणाऱ्या जगातील लोकसंख्येची टक्केवारी दुप्पट होऊ शकते. या परिस्थितीत, भारत सर्वात जास्त उष्ण तापमानाच्या प्रभावित देशांमध्ये असेल. हा अहवाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ३.८  अब्ज लोक, जे जगातील लोकसंख्येच्या सुमारे ४१ टक्के आहेत, ते धोकादायक उष्णतेच्या परिस्थितीला सामोरे जातील, जे २०१० मध्ये १.५४  अब्ज २३ टक्के होते. अति उष्णता म्हणजे असामान्यपणे उष्ण हवामानाचा काळ राहणार आहे. ज्यामध्ये तापमान अनेक दिवस 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान राहते.

लेखक जिझस लिझाना म्हणाले आहेत की, “भारत, नायजेरिया, इंडोनेशिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि फिलीपिन्स हे असे देश आहेत, तिथे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागाला अति उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. या देशांमधील लोकांना ३,०००  पेक्षा जास्त उष्ण तापमानाचा अनुभव घ्यावा लागणार आहे. घरांमध्ये सुरक्षित तापमान राखण्यासाठी आवश्यक असलेल्या उर्जेचे प्रमाण वाढणार आहे. ३,०००  पेक्षा जास्त म्हणजे वर्षभर दीर्घकाळापर्यंत तीव्र उष्णता राहणार आहे. थंड आणि गरम हवेच्या तापमानातील बदल १.५ अंश सेल्सिअस तापमानाच्या मर्यादेपर्यंत होतील. पुढील ५ वर्षांत अनेक घरांना एअर कंडिशनरची आवश्यकता असू शकते, परंतु जर जागतिक तापमान २ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले तर त्यानंतरही तापमान वाढतच राहणार आहे.

प्राध्यापक राधिका खोसला म्हणाल्या, “आमचा अहवाल एक गंभीर इशारा आहे. १.५ अंश सेल्सिअस तापमानाचा मर्यादे ओलांडल्यावर शिक्षणापासून आरोग्य, स्थलांतर आणि शेतीपर्यंत प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होणार आहे. वाढत्या उष्ण दिवसांच्या या प्रवृत्तीला उलट करण्याचा एकमेव स्थापित मार्ग म्हणजे निव्वळ-शून्य शाश्वत विकास. राजकारण्यांनी या दिशेने पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जगाचे सरासरी तापमान आधीच १.५  अंशांच्या अगदी जवळ पोहोचले आहे. ’अत्यंत थंड भागात राहणाऱ्या जागतिक लोकसंख्येचे प्रमाण १४  टक्कयांवरून ७ टक्कयांपर्यंत कमी होऊ शकते. कारण भविष्यात कमी ठिकाणे अत्यंत थंड राहतील. जागतिक तापमानवाढीच्या परिस्थितीत अति उष्णतेच्या संपर्कात येणाऱ्या लोकसंख्येपैकी भारत हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आहे. हे निष्कर्ष भारतातील लोकसंख्येच्या अति उष्णतेच्या वाढत्या असुरक्षिततेवर प्रकाश टाकतात. आणि वाढत्या तापमानाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी लक्ष्यित अनुकूलन आणि धोरणांची आवश्यकता अधोरेखित करतात.“

हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथील प्राध्यापक आणि हवामान तज्ञ अंजल प्रकाश म्हणाले, हा ऑक्सफर्ड अभ्यास एक गंभीर हवामान बदल होणार असल्याचे सांगतो. जर जीवाश्म इंधनांचा वापर वेगाने कमी केला नाही, तर अति उष्णता प्राणघातक आहे. २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या दुप्पट धोका निर्माण करू शकतो. भारतासारख्या असुरक्षित देशांमध्ये उष्ण तापमानाचा खुप परिणाम होणार आहे.

भारतात दाट लोकसंख्या आणि कमकुवत पायाभूत सुविधा असलेले प्रदेश आहेत. त्यामूळे आरोग्य, शेतीला एष्ण तापमानाचा गंभीर धोका निर्माण होतो. भारतात उत्तरेकडील भागात, उष्णतेच्या लाटा वायू प्रदूषणाच्या समस्या वाढवतात. तातडीने योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी अक्षय ऊर्जा, हरित वित्तपुरवठा आणि हवामान व वचनबद्धतेशी सुसंगत न्याय्य धोरणांचा जलद अवलंब करणे आवश्यक आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा