हरियाणा राज्यात लोकांच्या मतदान अधिकाराचे रक्षण करण्यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार; हरियाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह

SHARE:

चंदीगड – हरियाणा राज्यात लोकांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे, असे हरियाणा राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. हरियाणा राज्यातील एसआयआर नोंदणीवर राज्यातील काँग्रेस पक्ष व नेते मतदार यादीवर बारीक लक्ष ठेवणार आहे. ’एसआयआर प्रक्रियेसाठी कार्यकर्ते सक्रिय केले आहेत. राज्यातील मतदार यादीच्या अचूकतेवर लक्ष केंद्रित करा, जिल्हा आणि बूथ पातळीपर्यंत कडक लक्ष ठेवा, असे हरियाणा राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी कार्यकर्त्याना आदेश दिले आहेत.

हरियाणा राज्यातील काँग्रेस पक्ष निवडणूक पारदर्शकता पूर्ण करण्यासाठी हरियाणामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरावृत्ती टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहे. यासाठी, काँग्रेसने राज्यस्तरीय कृती आणि देखरेख समिती स्थापन करून राज्यातील मतदार यादीच्या अचूकतेबाबत आपली रणनीती अधिक तीव्र केली आहे. राज्यातील काँग्रेस पक्ष या हालचालीचे वर्णन केवळ औपचारिक प्रक्रिया नाही तर, हरियाणा राज्यातील लोकांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी एक मोहीम म्हणून काम करत आहे.

हरियाणा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, एसआयआर प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पक्षाच्या उच्च कमांडच्या सूचनेनुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा, सह-प्रभारी जितेंद्र बघेल, प्रफुल्ल गुडठे, आमदार बी.बी. बत्रा आणि माजी सीपीएस चौधरी रामकिशन गुर्जर तसेच रणधीर राणा ॲडव्होकेट यांचा समावेश आहे. राव नरेंद्र सिंह यांच्या मते, कधीकधी एसआयआर पुनरावृत्ती प्रक्रियेदरम्यान, नवीन पात्र मतदारांची नावे जोडली जात नाहीत, जुन्या मतदारांची नावे चुकून काढून टाकली जातात, किंवा यादीत चुकीच्या नोंदी केल्या जातात. या बाबी आणि चुकीच्या गोष्टी, अनियमितता रोखण्यासाठी, ही समिती “ग्राउंड-लेव्हलवर काम करत आहे.

हरियाणा राज्यातील काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, राज्यातील एसआयआरचा उद्देश अचूक, विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त मतदार याद्या सुनिश्चित करणे आहे. जर हरियाणा राज्यातील एसआयआर या प्रक्रियेत राजकीयदृष्ट्या प्रेरित फेरफार, मतदार जोडण्यात किंवा काढून टाकण्यात जाणूनबुजून दुर्लक्ष किंवा बूथ स्तरावर पक्षपात आढळून आला तर, काँग्रेस पक्ष त्याविरुद्ध कठोर कारवाई करणार आहे. एसआयआर प्रक्रियावर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेली समिती राज्यापासून जिल्ह्यांपर्यंत आणि बूथपर्यंत एक मजबूत समन्वय यंत्रणा स्थापन करणार आहे. जी वास्तविक वेळेत राज्यातील एसआयआर पध्दतीमधील तक्रारीवर लक्ष इेवेल आणि त्यावर काम करणार आहे.

हरियाणा काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन एसआयआर प्रक्रियेसाठी जागरूकता पसरवण्याचे, नवीन पात्र मतदारांना यादीत त्यांची नावे नोंदवण्यास प्रोत्साहित करण्याचे, आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित काँग्रेस पक्षच्या समितीला तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षाचा दावा आहे की, ही संपूर्ण मोहीम लोकशाहीची मुळे मजबूत करण्यासाठी आहे, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिक कोणत्याही अडथळ्याशिवाय मतदान करू शकेल. व राज्यातील एसआयआर प्रक्रियेतील चुकीच्या पध्दतीवर तक्रारीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा