अमेरिकतील लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्कर जेफ्री एपस्टाईच्या फायलींमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नाव; देशभरात उडाली खळबळ

SHARE:

नवी दिल्ली – अमेरिकतील लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्कर जेफ्री एपस्टाईच्या फायलींने एपस्टाईन फाइल्सने जगभरात खळबळ माजवली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अनेक अमेरिकन नेत्यांची नावे आल्याने मोठा हाहाकार माजला होता. आता या फाईल्समध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नाव आल्याने देशातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जेफ्री एपस्टाईनशी संबंधित नवीन फायली प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शनिवारी, काँग्रेसने एक्सवर दावा केला की नरेंद्र मोदींचे नाव एपस्टाईन फाइल्समध्ये आले आहे. अमेरिकन सिरीयल रेपिस्ट, बाल लैंगिक शोषण करणारा आणि मानवी तस्कर जेफ्री एपस्टाईन यांनी ९ जुलै २०१७ रोजीच्या ईमेलमध्ये लिहिले आहे…“ भारतीय पंतप्रधान मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये सल्ला घेतला आणि गाणी गायली आणि नाचले. ते काही आठवड्यांपूर्वी भेटले होते. ते यशस्वी झाले.
काँग्रेसने लिहिले की एपस्टाईन स्पष्टपणे सांगतात की मोदींनी माझा सल्ला घेतला आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये गाणी गायली आणि नाचले. त्यांनी असेही म्हटले की ते यशस्वी झाले.

लक्षात ठेवा, पंतप्रधान मोदी ४ ते ६ जुलै २०१७ या काळात इस्रायलच्या दौऱ्यावर होते. एपस्टाईन यांनी हा ईमेल तीन दिवसांनी लिहिला होता. मोदींनी २५ आणि २६ जून २०१७ रोजी इस्रायलच्या भेटीपूर्वी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. जेफ्री एपस्टाईन यांच्या ईमेलमधील दुवे जोडल्यास असे दिसून येते की मोदी जून २०१७ मध्ये अमेरिकेला भेटले होते आणि एपस्टाईनचा सल्ला घेतला होता.
एक आठवड्यानंतर मोदी इस्रायलमध्ये आले आणि सल्ल्यानुसार त्यांनी तेथे नाचगाणे केले आणि प्रकरण मिटले. आता हे स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान मोदींचे जेफ्री एपस्टाईनशी खोल आणि जुने संबंध आहेत, जे भारतासाठी लज्जास्पद आहे. ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची बाब आहे, ज्याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी दिले पाहिजे.

काँग्रेस पक्षाने तीन प्रश्न विचारले, ज्यात लिहिले होते कि नरेंद्र मोदी जेफ्री एपस्टाईनकडून कोणत्या प्रकारचा सल्ला घेत होते? अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कोणत्या फायद्यासाठी मोदी इस्रायलमध्ये नाचत आणि गात होते? एपस्टाईन यांनी लिहिले, ते काम करत होते,…तर याचा अर्थ काय? नरेंद्र मोदी, देश उत्तरे मागत आहे. सिरीयल रेपिस्ट एपस्टाईनशी तुमचे काय संबंध आहेत?

माहित असावे कि जेफ्री एपस्टाईन यांचे २०१९ मध्ये तुरुंगात निधन झाले. त्यांनी हा ईमेल कतार देशातील अधिकाऱ्याला पाठवला होता. हे ईमेल एपस्टाईनशी संबंधित तपास फाइल्सचा भाग आहेत, ज्यामध्ये ३५ लाख पृष्ठे आणि २००० व्हिडिओ समाविष्ट आहेत. अमेरिकन काँग्रेसने मंजूर केलेल्या कायद्याला प्रतिसाद म्हणून अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी या फायली प्रसिद्ध केल्या.

शनिवारी जेफ्री एपस्टाईनशी संबंधित नवीन तपास फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचे नाव आले, मात्र केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की जुलै २०१७ मध्ये पंतप्रधानांच्या इस्रायलच्या अधिकृत भेटीव्यतिरिक्त, उर्वरित ईमेल हे एका दोषी गुन्हेगाराच्या बकावसपेक्षा जास्त काही नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदना म्हटले आहे कि आम्हाला तथाकथित एपस्टाईन फाइल्समधून एका ईमेल संदेशाचा अहवाल मिळाला आहे. त्यात पंतप्रधान आणि त्यांच्या इस्रायल भेटीचा उल्लेख आहे. पंतप्रधानांच्या इस्रायलच्या अधिकृत भेटीव्यतिरिक्त उर्वरित ईमेल हे एका दोषी गुन्हेगाराच्या बकवासापेक्षा जास्त काही नाहीत आणि त्या पूर्णपणे दुर्लक्षित केल्या पाहिजेत

Leave a Comment

अधिक वाचा