नागपूरमध्ये सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या; मृत व्यक्ती बुलढाणा येथील रहिवासी होता

SHARE:

नागपूर – सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरने आत्महत्या केली आहे. नागपूर शासकीय रुग्णालयातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. डॉक्टर असलेल्या ऋत्विकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता, आणि २७ जानेवारी २०२६ रोजी तो मेडिकल कॉलेजमध्ये रुजू झाला होता.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने काल सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या या तरुण डॉक्टरने आत्महत्या केली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकारी डॉक्टरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तर याप्रकरणात नागपुरमधील गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बुलढाणा येथील रहिवासी ऋत्विक सागर ठाकूर असे मृत निवासी डॉक्टरचे नाव आहे. त्यानी मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. दोन्ही पालक डॉक्टर असलेल्या ऋत्विकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. २७ जानेवारी २०२६ रोजी तो कॉलेजमध्ये रुजू झाला होता. तो विभागप्रमुख डॉ दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता.

निवासी डॉक्टर नागपुरमधील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळ एका हॉटेलमध्ये राहत होता, तो कॉलेजला न आल्याने डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांना संपर्क साधला. वडिलांनी वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क केला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, डॉ. ऋत्विक यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. तपासात सुसाइड नोट सापडली नाही. याप्रकरणात अधिक तपास नागपूर पोलिस करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा