पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

SHARE:

चंदीगड – पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षांच्या राजकीय नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या सत्ताधारी नेत्याची ५  गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कार पार्क करत असतानाच या नेत्याला गोळया झाडल्या आहेत.माहितीनुसार, मॉडेल टाऊन येथील गुरुद्वाराच्या बाहेर ओबेरॉय यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. लकी ओबेरॉय हे गाडीत बसले होते. त्यांना यावेळी 5५  गोळ्या लागल्या आहेत. पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जालंधर येथे एका गुरुद्वाराबाहेर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ओबेरॉय हे गुरुद्वाराबाहेर आपली गाडी पार्क करत असताना हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. लकी ओबेरॉय यांच्या पत्नीने यापूर्वी आपच्या उमेदवार म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढवली होती.

पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी जालंधरमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या ओबेरॉय यांच्या हत्येनंतर पंजाब राज्यसरकारवर टीका केली आहे. त्यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या प्रशासनाखाली पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. जालंधरमधील एका गुरुद्वाराबाहेर आपचे नेते लकी ओबेरॉय यांची दिवसाढवळ्या झालेली हत्या हे पंजाब राज्यातील वास्तव परिस्थिती उघड करत आहे. जर पंजाबमधील सत्ताधारी पक्षाचे नेतेच सुरक्षित नसतील, तर पंजाब राज्यातील सामान्य नागरिकांसाठी सरकारची कोणती सुरक्षा आहे?,“ असा प्रश्न पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी विचारला आहे.

आज पंजाब राज्य हे भीती, टोळीयुद्ध आणि प्रशासकीय गुन्हेगारांच्या विळख्यात सापडले आहे, तर आप सरकार प्रसिद्धीत व्यस्त आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उत्तर दिले पाहिजे या संपूर्ण घटनेसाठी जबाबदार कोण आहे, असे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा म्हणाले आहेत. या घटनेनंतर, भाजपाचे प्रवक्ते म्हणाले की, पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. जालंधरच्या मॉडेल टाऊनमधील एका गुरुद्वाराबाहेर आम आदमी पक्षाचे आप नेते लकी ओबेरॉय यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तर सत्ताधारी पार्टी पंजाबसाठी एक धोका आहे.

Leave a Comment

अधिक वाचा