खेळ – वैभव सूर्यवंशी १९ वर्षांखालील विश्वचषक वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारताच्या उमद्या संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. या विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरले. टीम इंडिया आनंदातच असतानाच या क्रिकेट बोर्डाने एक ट्विट करून स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याला अटक करण्याची अजब मागणी केली आहे. काय आहे घडामोड?
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साहेबांच्या टीमला लोळवले. इंग्लंड संघाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. टीम इंडियाच्या या जबरदस्त खेळीबद्दल त्यांचे देशभरातून अभिनंदन होत आहे. कर्णधार आयुष्य म्हात्रे याच्या घरी तरी दिवाळी साजरी होत आहे. तर दुसरीकडे या विजयाचा शिल्पकार स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या गावी पण आनंदाचे उधाण आले आहे. दरम्यान या क्रिकेट बोर्डाने ट्विट करून वैभव सूर्यवंशी याला अटक करण्याची अजब मागणी केली आहे. काय आहे ती पोस्ट?
भारताचा ऐतिहासिक विजय
१९ वर्षांखालील विश्वचषक मध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाचा टीम इंडियाने दणदणीत पराभव केला. भारताने ५० षटकात ९ गडी बाद ४११ अशी विक्रमी धाव संख्या उभारली. यामध्ये वैभव सूर्यवंशी याने ८० चेंडूत १७५ धावांची कमाई केली. त्याच्या तडाखेबंद खेळीने या सामन्याची दिशाच पालटली. भारतीय संघाने या विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच ३५० पेक्षा अधिक धावा केल्या. पण इंग्लंड हे मोठे लक्ष्य गाठताना मोठा संघर्ष करावा लागला. दबावात या संघाला लय टिकवता आली नाही. हरारे येथील मैदानावर इंग्लंड संघ धराशायी झाला.
वैभव सूर्यवंशीचे द्विशतक थोडक्यात हुकले
भारताचा तडाखेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी याने या अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावांची ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या १७५ धावांमध्ये १५ चौकार आणि १५ षटकारांची तुफान खेळी आहे. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. इंग्लंडच्या खेळाडूंनी वैभवला आऊट करण्यासाठी जंग जंग पछाडले. कमी गतीची गोलंदाजी केली. शॉर्ट चेंडू टाकला, फिरकी टाकून पाहिली. पण त्याचा काहीएक परिणाम दिसला नाही. त्याची झंझावाती खेळी सुरूच होती. पण दुहेरी शतक त्याला गाठता आले नाही. २५ धावा कमी पडल्या. नाहीतर विश्वचषकात एक विक्रम त्याच्या नावावर नोंदवल्या गेला असता.
Someone arrest Vaibhav Sooryavanshi right now. This violence on the field against the English bowlers is X-rated!
— Iceland Cricket (@icelandcricket) February 6, 2026
वैभवला अटक करा
वैभव सूर्यवंशी मैदानावर तुफान खेळी करत असताना सोशल मीडियावर ही चर्चांना आणि कमेंट्ना एकच उधाण आले होते. सोशल मीडियावर त्याच्या तडाखेबंद खेळीची चर्चा होत होती. त्याचवेळी आइसलँड क्रिकेट या संघाने एक मिश्कील ट्वीट केले. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टनुसार “वैभव सूर्यवंशीला आत्ताच अटक करा. इंग्लंडच्या गोलंदाजाविरुद्ध मैदानावर झालेला हा हिंसाचार आहे.” म्हणजे वैभवने इंग्लंडच्या गोलंदाजांना तुफान धुतल्याने ही गंमतीशीर पोस्ट करण्यात आली आहे. त्यावर कमेंटसचा पाऊस पडला आहे.




