रितेश – जिनिलियाचा नात्याबद्दल मोठा खुलासा…

SHARE:

मनोरंजन विश्व : अभितेना रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं… अता नुकताच झालेल्या मुलाखतीत रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा…

अभितेना रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख आज यांच्याबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ सिनेमात दोघांची पहिली भेट झाली आणि पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं… १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनिलिया यांनी लग्न केलं.. आज रितेश आणि जिनिलिया चाहत्यांना कपल गोल्स देतात. पण आता दोघांच्या नात्याबद्दल एक मोठं सत्य समोर आलं आहे. खुद्द रितेश आणि जिनिलिया यांनी लग्नापूर्वीच्या रिलेशनशिपबद्दल मोठं खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र रितेश आणि जिनिलिया यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या पॉडकास्ट दरम्यान अभितेना रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुरुवातीला जिनिलिया म्हणाली, ‘आम्ही दोघेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. मी तेव्हा साऊथ सिनेमांमध्ये जास्त काम करायचे आणि रितेश देखील त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असायचा… व्यस्त वेळापत्रकामुळे आम्हाला फार भेटता यायचं नाही. आम्ही आमच्या कामात व्यस्त असायचो… तरी देखील एकमेकांबद्दल आम्हाला सर्व गोष्टी माहिती होत्या… तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त आमच्या करियरवर लक्ष केंद्रित केलं होतं…’ असं जिनिलिया म्हणाली.

यावर पुढे रितेश देशमुख म्हणाला, ‘आम्ही १० वर्ष एकमेकांना डेट केलं. पण जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हाच आम्ही एकमेकांसोबत राहायला सुरुवात केली. आम्ही कायम आमच्या मित्रांसोबत फिरायला जायचो. पण आमचे रुम्स कायम वेगळे असायचे… कोणतं शुटिंग असेल तरी, आम्ही वेग-वेगळ्या रुम्समध्ये राहायचो… जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र राहायला लागलो… तेव्हाच म्हणजे लग्नानंतर आमच्या खऱ्या आणि नव्या जीवनाची सुरुवात झाली.’, आज रितेश आणि जिनिलिया चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

यावर पुढे रितेश देशमुख म्हणाला, ‘आम्ही 10 वर्ष एकमेकांना डेट केलं. पण जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हाच आम्ही एकमेकांसोबत राहायला सुरुवात केली. आम्ही कायम आमच्या मित्रांसोबत फिरायला जायचो. पण आमचे रुम्स कायम वेगळे असायचे… कोणतं शुटिंग असेल तरी, आम्ही वेग-वेगळ्या रुम्समध्ये राहायचो… जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र राहायला लागलो… तेव्हाच म्हणजे लग्नानंतर आमच्या खऱ्या आणि नव्या जीवनाची सुरुवात झाली.’, आज रितेश आणि जिनिलिया चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!