साताऱा जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर बिबट्याचा हल्ला

SHARE:

साताऱा – जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. साताऱ्यामध्ये अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यावर बिबट्याचा हल्ला, झाला आहे. प्रचारासाठी जात असताना अचानक बिबट्याने अंगावर झडप घातली आहे. कराड तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे.

या हल्ल्यात अधिराज पाटील यांना पायाला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे-शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री 8 वाजता घडली आहे. अधिराज पाटील हे आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे. यावेळी दुचाकी चालवत असलेले धनाजी पाटील हे थोडक्यात बचावले आहे. प्रचार आटोपून माघारी येताना ही घटना घडली आहे.

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगटाचे नेते आहेत. प्रचार आटोपून परतत असतानाच ही घटना घडल्याने परिसरात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अधिराज पाटील यांना तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. कराड तालुक्यातील उंडाळे-शेवाळवाडी नागरिकांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

उंडाळे आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढतआहे. शाळेची मूले, कामगार, नोकरदार यांच्यामध्ये दहशत आहे. राज्यात मानव व बिबट्याच्या संघर्षाच्या घटनांमुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कराड तालुक्यातील स्थानिक नागरिकांकनी केली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी वेशीपर्यंत बिबट्यांची भीती वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे बिबट्यांचे हल्ले वाढत आहे. वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी होत आहे. तरी, राज्यातील वन्यजीवप्रेमी आणि वन्यजीवतज्ज्ञ मात्र या भूमिकेला विरोध करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील वनविभाग कोणती भूमिका घेतो, हे महत्वाचे आहे.

Leave a Comment

अधिक वाचा