विजयपूर – कर्नाटकमध्ये विजयपूर येथे विमानाचा अपघात झाला आहे, या अपघातात २ जण जखमी झाले आहेत. कर्नाटकातील कलबुर्गीहून बेळगावला जाणारे एक विमान विजयपूरच्या शेतात कोसळले आहे. तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले आहे.
बेळगाव कर्नाटकातील विजयपूर येथे विमानाचा अपघात झाला आहे. कलबुर्गीवरून बेळगावला जाणारे एक खासगी विमान विजयपूरमधील बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावात कोसळले आहे. या अपघातात २ जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विजयपूर येथे अपघातग्रस्त झालेले विमान हे रेड बर्ड कंपनीचे एक खासगी प्रशिक्षण विमान असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच, कर्नाटक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ही घटना बबलेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या विमानाने कर्नाटकातील कलबुर्गीवरून बेळगावसाठी उड्डाण केल्यावर काही वेळात ही अपघाताची घटना घडली आहे.
कर्नाटकात अपघातग्रस्त विमान हे कलबुर्गीहून बेळगावला चालले होते. उड्डाण केल्यानंतर या विमानात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला किंवा इंधन संपले होते आणि हे विमान खाली पडल्याचे सांगण्यात आले आहे. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर जवळ असलेल्या मंगळूरू गावाच्या परिसरातील एका शेतात हे विमान जमिनीवर पडले आहे. या विमानातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी हे अपघातात वाचले आहेत. या अपघातात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे २ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी बीएलडीई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेत विजयपूर परिसरातील स्थानिक नागरिक मदतीसाठी आले होते.
कर्नाटक राज्यात वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान आहे. हे विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले आहे. या विमान अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदत केली आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले आहे. सध्या २ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या विमान अपघाताची माहिती मिळाल्यांतर, ते पाहण्यासाठी विजयपूर परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या कर्नाटक राज्यातील विमान अपघातात प्रकरणात अधिक तपास कर्नाटक पोलिस करत आहेत.




