मुंबई – बांगलादेशात मंदिरांवर हल्ले व हिंदूंच्या हत्या सुरू असताना देशातील भाजपा सरकारने भारताच्या अर्थसंकल्पातून बांगलादेशला कोट्यवधींचे दान देणे हे संतापजनक आहे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यात भाजपाच्या हिंदुत्ववादाने सत्ता स्थापनेसाठी एमआयएम सारख्या पक्षांशी हातमिळवणी केल्यावर, भाजपचा मित्रगट शिंदे शिवसेना तरी कसा मागे राहील? अशी टीकाही ठाकरे शिवसेनेने केली आहे.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका संपून निकाल लागले, व आता काही ठिकाणी महापौर बसवण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. हातात सत्ता, पैसा व पोलीस असले की, राज्यातील कोणत्याही शहरात काय, तर चंद्रावर आणि मंगळावरही भाजपा त्यांचा महापौर बसवू शकतो. मुंबईच्या महापौरपदी भाजपने रितू तावडे यांची महापौरपदी निवड केली. मुंबई मराठी माणसाची आहे हे भाजपला मान्य करावे लागले. त्यामुळे भाजपास मनाविरुद्ध का होईना, पण मुंबईत महापौरपदासाठी मराठी चेहरा द्यावा लागला आहे.
बांगलादेशात मंदिरांवर हल्ले व हिंदूंच्या हत्या सुरू असताना भारताने अर्थसंकल्पातून बांगलादेशला कोट्यवधींचे दान द्यावे हे संतापजनक आहे. हे मुंबईच्या महापौरांनी समजून घेतले पाहिजे. मुंबईत बाजूच्या मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये मध्ये भाजपाने अमराठी महापौर केला आहे. तेथील मराठी लोकांची मागणी होती, मराठी असावा. राज्यात भाजपच्या हिंदुत्ववादाने सत्ता स्थापनेसाठी एमआयएमसारख्या पक्षांशी हातमिळवणी केली आहे. तर त्यांचा मित्रपक्ष शिंदे गट तरी मागे कसा राहील. मालेगाव महानगरपालिकेत शिंदे गटाने एमआयएमसोबत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्लॅन फसला. तिथे इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांची महापौरपदी निवड झाली आहे.
राज्यात कधीही उघडपणे काहीही बोलणारे भंपक व टाकाऊ लोक सत्ताधारी भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत. राज्यातील जनतेच्या करांतून येणार्या निधींचे वाटप चूकीच्या पद्धतीने करणे हा सरकारी पैशांचा अपहार आहे. भाजपा सरकार राज्यातील निधीचा चुकीचा वापर करत आहे. राज्यातील निवडून आलेल्या प्रत्येकाचा सरकारी निधीवर समान अधिकार आहे, पण भाजपाने राज्यातील लोकशाही संस्कृतीचे अपमान केला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारचा चूकीचा आणि मनमानी कारभार चालू आहे. त्यामुळे महानगरपालिकांत भाजपाचे महापौर किंवा त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार हे स्पष्ट दिसत आहे. अशी टीका ठाकरे शिवसेनेने केली आहे.





