संभाजीनगरमधील १२ वीच्या परिक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणात, शिक्षण संस्था चालक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांवर कडक कारवाईचे आदेश

SHARE:

छत्रपती संभाजीनगर – १२ वीच्या परिक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणात, शिक्षण संस्था चालक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. संभाजीनगरमधील जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरणात शिक्षकांवर कारवाई होणार आहे. राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरणात, सर्व दोषींवर मोठी कारवाई होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर ता. कन्नड येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूरमधील या सामूहिक कॉपी प्रकरणात मोठी व कडक कारवाई होणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री यांनी आदेश दिले आहे.

१२ वीच्या परिक्षा केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखालीच विद्यार्थ्यांना सामूहिकरित्या कॉपी पुरवली आहे, त्या कॉपी पुरवल्या घटनेचे दृश्य समोर आले आहेत. संभाजीनगर मधील या सामूहिक कॉपी प्रकाराने राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेची राज्यातील सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर मधील संबंधित शिक्षण संस्था चालक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. १२ वीच्या परीक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणावर विभागीय स्तरावर समितीमार्फत दोषींची सखोल चौकशी होणार आहे.

संभाजीनगरमधील कॉपी प्रकरणात दोषी सापडल्यावर हे परीक्षा केंद्रच रद्द होणार आहे. शिक्षण विभागाच्या चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संभाजीनगरमधील संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार आहे. भविष्यात त्या परिक्षा केंद्राला परीक्षा घेण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरवले जाणार आहे. तसेच संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणात शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व शिक्षकांवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा आदेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. राज्यात कॉपीमूक्त अभियानाच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगरातील सामूहिक कॉपी प्रकरण समोर आले आहे.

राज्यात १० फेब्रुवारी २०२६ पासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली आहे. तरी पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षा या राज्य शासनाच्या अभियानाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर परिक्षा अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील पालकांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील ज्या केंद्रांवर असे सामूहिक कॉपीचे गैरप्रकार घडले आहेत, राज्यातील त्या परिक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली जाणार आहे. आणि भविष्यात त्यांना पुन्हा परीक्षा केंद्र म्हणून परवानगी दिली जाणार नाही.

तसेच राज्यातील केवळ शाळेतील विद्यार्थीच नव्हे, तर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि गरज भासल्यास पालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर मधील सामूहिक कॉपी प्रकरणात १९ जणांना निलंबित करण्यात येणार आहे, तर आणखी दोषी सापडलेल्या शिक्षकांवर कडक कारवाईची केली जाणार आहे, असे शिक्षण मंत्री म्हणाले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये सामूहिक कॉपी प्रकरणात राज्यातील शिक्षण विभागाने १९ जणांना निलंबित केले आहे. यात संभाजीनगर जिल्ह्यातील झेडपीचे ३  शिक्षक, २  केंद्रसंचालक, १७ पर्यवेक्षक आणि कॉपी पथकातील सदस्यांचा समावेश आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील काही खासगी शिक्षण संस्थांचे कर्मचारी यांच्यावर कडक कारवाईच्या होणार आहे. संभाजीनगरमधील जैतापूर मधील या १२  वीच्या परिक्षा केंद्रावर १४  वर्गांमध्ये सुमारे ३७० विद्यार्थी १२ वीची परीक्षा देत होते. आता या संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणात आणखी काही शिक्षकांवर कडक कारवाई होणार आहे. तर राज्यातील ज्या ठिकाणी असे कॉपी प्रकरण होईल, त्या परिक्षा केंद्रावर व तेथील शिक्षकांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असे राज्यातील शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा