भंडारबोडी – नागपूरमध्ये कापूस कारखान्यात आग लागल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर एक लहान मुलगा जखमी झाला आहे. करोडो रुपयाचा कापूस जळून खाक झाला आहे. नागपूरमध्ये कापूस कारखान्यात अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडाली आहे. आग लागल्याने मोठ्या प्रमाणात कापूस साठा जळून खाक झाला आहे. असून एका लहान मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. नागपूरमधील कुही तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरमधील कुही-अंभोरा मार्गाजवळील भंडारबोडी येथील एका कापूस प्रक्रिया कारखान्यात आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
आग लागली त्या वेळी परिसरात काम सुरू होते आणि काही नागरिकही जवळ होते. याच गोंधळात एका लहान मुलाला भाजल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली आहे. या आागीच्या घटनेनंतर गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. कापूस कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच, नागपूरमधील स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन यंत्रणा सक्रिय झाली. काही वेळाने २ अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या.
यानंतर मौदा आणि उमरेड येथील बचाव पथकेही मदतीला दाखल झाली. कापूस कारखान्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर साठवलेला कापूस असल्याने आग वेगाने पसरली. रात्री उशिरापर्यंत धुर आणि जाळ दूरून दिसत होते. कापूस कारखान्यातील आग विझवण्यासाठी अग्निशमन जवानांना अनेक तास मेहनत घ्यावी लागली आहे. या कापूस कारखान्याच्या घटनेमुळे परिसरात लोकांमध्ये भीती पसरली आहे. आगीची तीव्रता इतकी होती की, आसपासच्या घरांमधील नागरिक बाहेर पडले. काही काळ वाहतूकही सावधगिरी म्हणून थांबवण्यात आली होती. परिसरातील लोकांनी सुरक्षित अंतर ही परिस्थिती पाहिली. मोठ्या प्रमाणावर कापूस जळाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत ठिणगीमुळे ही दुर्घटना घडली आहे असे सांगितले जात आहे.
कारखान्यातील ज्वलनशील वस्तूंमुळे आग नियंत्रणात आणणे अधिक अवघड झाले. आगीत जखमी झालेल्या मुलाला तातडीने नागपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक रुग्णालयात उपस्थित आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. सुरक्षा उपायांची तपासणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. नागपूरमध्ये या कापूस कारखान्यात मोठी आग लागल्यामूळे करोडो रूपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.





