जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली, २१७ कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा डाव उघडकीस

SHARE:

जळगाव – जिल्ह्यामध्ये केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली २१७ कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा डाव उघडकीस आला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील बनावट विमा प्रकरणात ४ तालुक्यांतील नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पिकासाठी २१७ कोटींचा विमा लाटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बनावट विमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली २१७ कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा डाव उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा भांडाफोड उपग्रहाद्वारे केलेल्या तपासणीत झाला आहे. राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये केळीची लागवडच नसताना बनावट लागवड दाखवून पीक विम्याचे बनावट अर्ज सादर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

एकट्या जळगाव जिल्ह्यात हजारो बनावट अर्ज सापडले आहेत. उपग्रह तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.राज्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी अर्जांची संख्या अचानक वाढल्याने संशय निर्माण झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ हजार २५९ अर्जांची वाढ झाली आहे. विमा संरक्षित क्षेत्र २८ हजार १९६ हेक्टरने वाढले आहे. ही वाढ अनैसर्गिक वाटल्याने कृषी आयुक्तालय यांनी उपग्रहाच्या साहाय्याने तपासणी केली आहे. या तपासणीत जळगाव जिल्ह्यातील 96 हजार १५२ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रापैकी केवळ ५२ हजार ११० हेक्टरवरच केळीची लागवड झाली आहे हे स्पष्ट झाले आहे. तर बाकी ४४ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर केळी पीकच नसल्याचे आढळून आले आहे.

म्हणजेच, जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे बनावट विमा अर्ज दाखल करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात या बनावट अर्जदारांनी विमा हप्त्यापोटी भरलेले ३७ कोटी ४३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात वेळेत तपासणी झाल्याने ,राज्य सरकारचा १२३ कोटी ५३ लाख आणि केंद्र सरकारचा ९३ कोटी ५८ लाख असा सुमारे २१७ कोटी रुपयांचा अनुदान निधी वाचला आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी लागवड बनावट विमा प्रकरणात ४ तालुक्यांतील नागरिकांची फसवणूक झाली आहे. राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील कृषी आयुक्तांच्या पथकाने केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत जळगाव जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील ७४ शेतकऱ्यांकडे केळी पीकच नसल्याचे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांनी अवघा ८ लाखांचा विमा हप्ता भरून २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई लुबाडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील या केळी लागवड प्रकरणातील बनावट विमा अर्जदारांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश जळगाव जिल्ह्यातील कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचा विम्यात सर्वाधिक वाटा असल्याने अशा प्रकारचे गैरप्रकार वारंवार समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले की, अद्याप कृषी आयुक्तालय किंवा विमा कंपनीकडून अधिकृत अहवाल प्राप्त झाला नाही, आकडेवारी उपलब्ध नाही. तर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही या प्रकरणाचा अहवाल मागवून योग्य ती कडक कारवाई केली जाणार आहे असे म्हटले आहे. आत राज्यातील जळगाव जिल्ह्यात केळी लागवड प्रकरणातील, बनावट विमा अर्ज दाखल झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा