आज शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ ! आज जागतिक प्रेम दिवस, शनिदेवाची कृपा कोणावर होईल, वाचा आजचे राशीभविष्य

SHARE:

राशीभविष्य – आज १४ फेब्रुवारी २०२६ , आजचा वार शनिवार आहे. आज जागतिक प्रेम दिवस आहे. प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्ती साठी व अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान लक्ष्मीनारायणाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
आज तब्येतीच्या दृष्टीने थोडी सावधानता बाळगायला हवी काही बळवलेल्या आजारांमध्ये एकापेक्षा अनेक डॉक्टरांचा सल्ला घेणे ही आवश्यक राहील.

वृषभ रास (Taurus)
बौद्धिक कामे करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस पर्वणी ठरणार आहे परंतु नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या म्हणीचा प्रत्ययही येईल.

मिथुन रास (Gemini)
नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी नवीन काहीतरी करण्याचा संकल्प अवश्य कराल.

कर्क रास (Cancer)
आज जे ठरवाल ते तडीस नेण्याचा प्रयत्न कराल आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मनस्वास्थ्य चांगले राहील.

सिंह रास (Leo)
विद्यार्थ्यांना आपल्या मनाप्रमाणे अभ्यास करता येईल त्यामध्ये योग्य ते संशोधन केले जाईल.

कन्या रास (Virgo)
महिलांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल तुमच्या व्यापारी वृत्तीमुळे स्वतःपेक्षा इतरांकडून कामे करून घेण्यात निष्णात राहाल.

तूळ रास (Libra)
तुम्ही हिशेबाला पक्के आहात हे इतरांना आज समजणार आहे परंतु दुसऱ्याशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे त्याचे भान ठेवा.

वृश्चिक रास (Scorpio)
अभिमानाने अहंकार यातील लक्ष्मण रेषा ओळखा आपल्या मर्जीतील माणसासाठी खूपच उदार बनाल.

धनु रास (Sagittarius)
स्थावरा संबंधी कामे संघर्षातून मार्गी लागतील धंद्यातील पार्टनर बरोबर समजुतीचे धोरण न ठेवल्यास वाद होण्याची शक्यता.

मकर रास (Capricorn)
प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असले तरी टोकाची भूमिका महागातच पडेल.

कुंभ रास (Aquarius)
महिलांना जास्त कष्ट पडले तरी समाधानी राहतील वादविवाद तळून सहकार्याने समस्या सोडवण्यात वाकबगार राहाल.

मीन रास (Pisces)
नुसत्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना फायदा होईल.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा