जळगावातील आदिवासी शंकर भिल यांची अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने केली पीएचडीसाठी निवड

SHARE:

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील नागझिरी एका लहानशा गावातील आदिवासी समूहातील शंकर भिल यांची अमेरिकेतील सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाने पीएचडी करण्यासाठी निवड केली आहे. २६ वर्षीय शंकर यांना अंदाजे ७० ते ७५ लाख रुपयांची नऊ महिन्यांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. शंकर यांनी संशोधनासाठी एक असा विषय निवडला आहे जो त्यांच्या आणि आदिवासी समुदायाच्या वेदनेशी संबंधित आहे. ‘आदिवासी जमीन बिगर-आदिवासींच्या हाती कशी गेली’, यावर ते संशोधन करणार आहेत.

बीबीसीशी बोलताना शंकर भील म्हणाले कि माझ्या विद्यापीठाने मला नऊ महिन्यांसाठी ७१ हजार डॉलर्सचा निधी दिला आहे. भारतीय चलनात याचा अंदाजे ७० ते ७५ लाख रूपये इतका होतो. शंकरच्या मते, त्याचे अभ्यासक्रम पहिल्या दोन वर्षांसाठी सुरू होतील, त्यानंतर परीक्षा आणि संशोधन होईल. फेलोशिपच्या पहिल्या नऊ महिन्यांनंतर, त्याला दुसऱ्या वर्षापासून विद्यापीठात सहाय्यक म्हणून काम करावे लागेल
शंकरने बीबीसीला सांगितले कि आमच्या भिल्ल समुदायाने क्षुल्लक कारणांसाठी आपली जमीन गमावली. कधी फक्त एका रुपयासाठी, कधी १००० रुपयांच्या कर्जासाठी, तर कधी १० हजार रुपयांसाठी. माझ्या आजीची आणि माझ्या आईची जमीन देखील अशाच प्रकारे हिरावून घेण्यात आली. मला हे समजून घ्यायचे आहे की ही प्रक्रिया काय होती? त्यात सरकारची काही भूमिका होती का?“

शंकरने आपल्या संभाषणात आदिवासी विद्यार्थ्यांच्या यशाला केवळ आरक्षणाशी जोडणाऱ्या सामाजिक मानसिकतेवरही टीका केली. शंकरने स्पष्ट केले की त्याने अजीम प्रेमजी विद्यापीठ (बेंगळुरू) येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, जी एक खाजगी संस्था आहे जिथे कोणतेही आरक्षण नाही. आता तो अमेरिकेत जात आहे, जिथे कोणतेही आरक्षण नाही. तो म्हणता कि या यशाचे श्रेय कठोर परिश्रमाचे परिणाम आहे, कोणत्याही कोट्याचे नाही.

नागझिरी गावात फक्त २०-२५ कुटुंबे आहेत आणि लोकसंख्या सुमारे १०० आहे. येथील बहुतेक लोक वीटभट्टी किंवा उसाच्या शेतात रोजंदारीवर किंवा मजूर म्हणून काम करतात. या गावात शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी आहे. शंकर भील ११वीत असताना वडील वारले. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्याची आई सिंधुबाई भिल यांच्यावर आली. सिंधुबाईंना दिवसाला फक्त २५  रुपये मिळायचे. तरीही, तिने कधीही मुलांचे शिक्षण थांबवले नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आईने शंकरच्या शिक्षणाचा आग्रह धरला.

शंकरने भील यांनी इतके कठोर परिश्रम केले की त्याला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक असलेल्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्याची एथनिक स्टडीजमध्ये पीएचडीसाठी निवड केली. पहिली दोन वर्षे अभ्यासक्रम असतील, त्यानंतर परीक्षा असतील आणि त्यानंतर संशोधन कार्य सुरू होईल. शिष्यवृत्तीची रक्कम भारतीय चलनात अंदाजे ७० ते ७५ लाख रुपये आहे. ही निधी नऊ महिन्यांसाठी आहे. शंकरच्या यशाने संपूर्ण आदिवासी समुदायातील तरुणांना नवीन मिळाली आहे.
शंकर यांनी आपल्या समुदायातील तरुणांना एक महत्वाचा संदेश दिला तो म्हणजे शिक्षण. ते म्हणाले कि आपल्याकडे ना कुटुंबिक भांडवल आहे, ना मजबूत सामाजिक नेटवर्क आहे, ना व्यवसाय उभारण्यासाठी संसाधने आहेत. आपल्याकडे पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. असे सांगत त्यांनी एक प्रकारे आदिवासी समाजतील मुलांना शिक्षण घेण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

अधिक वाचा