अजित दादांचा अपघात की घातपात लवकरच सत्य समोर आणणार, तर अपघात प्रकरणातील अहवालासाठी रोहित पवारांकडून खासगी गुप्तहेरांची भेट

SHARE:

नवी दिल्ली – अजित दादांचा अपघात की घातपात लवकरच सत्य समोर आणणार आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत. तर विमान अपघात प्रकरणातील अहवालासाठी रोहित पवारांकडून खासगी गुप्तहेरांची भेट घेण्यात आली आहे. रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली आहे. अजित दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणण्यासाठी रोहित पवार दिल्लीला गेले आहेत. राज्यातील सरकार दाद नसल्यामूळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचे कारण शोधून काढायला रोहित पवारांनी मोठे पाऊल उचलले आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सध्या दिल्लीला गेले आहेत.

दिल्लीत राहून रोहित पवार एक महत्त्वाचे काम पार पाडत आहेत. आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. सरकारने या अपघाताची पाहिजे तशी चौकशी केली नाही. चौकशी लावण्यापलीकडे फार काही राज्यातील सरकारने केले नाही. त्यामुळे आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रोहित पवार सध्या दिल्लीतील हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य मोठ्या पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा अहवाल येण्यास वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

मात्र, हा अहवाल लवकर मिळावा यासाठी आमदार रोहित पवार हे खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य लवकर समोर आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी हा हा महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. अजित दादांच्या अपघात होऊन वीस दिवस झाले असून अद्यापही राज्यातील सरकारकडून कोणताही प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणार्या कंपनीविरोधात राज्यसरकारने कोणतीही कडक कारवाई केलेली नाही.

त्यामूळे शंका अधिक वाढत चालल्या आहेत. व अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावर रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा व दोषींवर योग्य ती कडक कारवाई करावी, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. सध्या या विमान दुर्घटनेची राज्यातील संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. मात्र, या सगळ्या चौकशीतून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत निर्माण झालेला घातपाताचा संशय वाढत चालला आहे, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा