भिवंडी महानगरपालिकेत महापौर निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये फूट, तर बहुमतासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू

SHARE:

मुंबई – भिवंडी महानगरपालिकेत महापौर निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये फूट पडली आहे, तर बहुमतासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भिवंडीत महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये फूट पडली आहे. तर भिवंडीत महापौर नक्की कोणाचा होणार यावरून नवीन वाद सूरू झाला आहे. भिवंडी महानगर पालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच राजकीयपक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भिवंडी महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहेत.

भिंवडी महापालिकेत महायुतीमध्ये फूट पडली आहे आणि विरोधी पक्षांतील अंतर्गत नाराजीमुळे सत्तास्थापनेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भिवंडी महापालिकेतील एकूण ९० जागांपैकी बहुमताचा आकडा ४६ आहे. निवडणूक निकालानंतर विविध पक्षांचे सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भिवंडी महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना करण्यात आली आहे.

या आघाडीकडून महापौर पदासाठी तारीक मोमीन यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र, समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे आमदार रईस शेख यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. समाजवादी पक्षाने महापौर पदाची मागणी केली आहे. तर त्यामूळे आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून अद्याप या मागणीला होकार देण्यात आलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा आकडा ४२ वरच अडकला आहे.

भिवंडी महानगरपालिकेत बहुमत गाठण्यात अडचण निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून ३४ नगरसेवक आहेत. मात्र, महायुतीतही महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात अंतर्गत वाद वाढला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. संपूर्ण राजकीय गणितात कोणार्क विकास आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

मात्र, या आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांच्यावर सुरू असलेल्या पोलीस कारवाईमुळे, त्यांचा महापौर पदाचा अर्ज न्यायालयीन सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते भाजप-शिवसेनेला मदत करणार की तटस्थ राहणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. भिवंडी महानगरपालिकेतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अंतर्गत वादाच्या घडामोडींमुळे, अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा