लातूर – शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. शासकीय हॉस्टेलमधील झालेल्या वादातून महाविद्यालयात शिकणार्या तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. लातुरात २१ वर्षीय महाविद्यालयात शिकणार्या तरुणाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. ही घटना घडताच आरोपी तरुण पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत. पोलिसांनी २ सशयितांना अटक केले आहे. लातूर शहरात ही घटना घडली आहे. विक्रम पांचाळ या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे.
ही घटना लातूरमधील औसा रोडवरील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील वादामुळे शिक्षण घेणार्या तरुणांच्या दोन गटात वाद झाला. आणि त्यातून या तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. लातूरमधील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. या हाणामारीत विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. विक्रम पांचाळ हा लातूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. तो हॉस्टेलवर राहत होता. तो लातूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुण घटना घडताच पळून गेले आहेत. त्यांचा पोलीस पथक शोध घेत आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे लातूर शहरातील औसा रोड परिसरात काही काळ वाद निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लातूर पोलीस हल्ल्यामागील नेमके कारण शोधत आहेत. तर याप्रकरणातील इतर आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लातूरमधील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता औसा रोड व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणात अधिक तपास लातूर पोलिस करत आहेत.




