नवी दिल्ली – देशात बलात्काराच्या आरोप असलेले आणि याच आरोपात तुंरूंगाची हवा खात असलेल्या जंतांची यादी मोठी आहे. आता या यादीत आणखी एका जंताचा समावेश झाला आहे. उत्तम स्वामी असे या जंताचे नाव आहे. राजस्थानातील एका तरूणीने या जंताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा बलात्कारी जंत भूमीगत झाला असून त्याने जबलपूर येथील कथेचा कार्यक्रम देखील रद्द केला आहे.
महामंडलेश्वर उत्तम स्वामी बलात्काराच्या आरोपांनी वेढले आहेत. राजस्थानमधील एका तरुणीने त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान, मध्य प्रदेशातील जबलपूर येथील त्यांच्या आश्रमात उत्तम गोस्वामींची कथा सुरू होती. एफआयआरनंतर, उत्तम स्वामींची कथा रद्द करण्यात आली असून हा भगवाधारी जंत भूमिगत झाला आहे.
श्री पंच अग्नि आखाड्यातील महामंडलेश्वर उत्तम स्वामींची कथा भेडाघाट येथील हिरापूर येथे आयोजित करण्यात आली होती. येथील उत्तम स्वामींचा आश्रम सुमारे 10 एकरांवर पसरलेला आहे. बलात्कार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या आश्रमात खळबळ माजली आहे. आता हा बलात्कारी साधू आपल्या भक्तांना भेट देण्यास टाळत आहे. इतकेच नाही तर मीडियासमोर येण्यास देखील टाळत आहे.
दुसरीकडे कथेसाठी आलेल्या लोकांनी आता घरची वाट पकडत आहेत. उत्तम स्वामी या बलात्कारी जंताचे देशाच्या विविध भागात आश्रम असल्याचे सांगितले जाते.
राजस्थानमधील एका तरुणीने दिल्ली पोलिसांकडे ईमेलवरून तक्रार दाखल केली, ज्यामध्ये या जंताने अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तिचे शोषण केले. ती अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार सुरू झाल्याचा तिचा दावा आहे. धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचाही तिचा आरोप आहे. तिने संरक्षणाचीही मागणी पोलिसांना केली आहे.
पीडितेचा असाही आरोप आहे की एफआयआरनंतर तिला धमक्या दिल्या जात असून तडजोड करण्यासाठी दबाव आणला जात आहे. शिवाय, तिच्या कुटुंबावरही लक्ष ठेवले जात आहे. तिला असुरक्षित वाटत आहे.उत्तम स्वामी अनेक वर्षांपासून तिचे शोषण करत असल्याचा आरोप महिलेने केला. पीडितेच्या मते, तिच्याकडे आरोपांशी संबंधित पुरावे आहेत. त्यात सहभागी असलेले लोक प्रभावशाली असून ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात.
पीडितेचा दावा आहे की तो एक स्वयंघोषित आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करेल. उत्तम स्वामी या भोंदूचे देशभरात अनेक ठिकाणी आश्रम आहेत. राजस्थानातील तरूणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर आध्यात्मिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भोपाळ आणि जबलपूरसह मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये बरीच चर्चांना उधान आले आहे. तो राजकीयदृष्ट्याही प्रभावशाली असून अनेक मोठे राजकारणी त्याचे शिष्य मानले जातात.




