मुंबई – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गेल्या महिन्यात बारामती विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात विमान जळून खाक झालं. मात्र विमानाची शेपटी सुस्थितीत असल्याचे शंका उपस्थित केली जात आहे. कारण याच शेपटीमध्ये ब्लॅक बॉक्स असतो. मात्र विमानाची शेपटी सुस्थितीत असतानाही ब्लॅक बॉक्स जळाल्याचे वृत्त समोर आले आहे. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोर मिटकरी यांनी शंका उपस्थित केली आहे. अजितदादांच्या विमानाची शेपटी सुस्थितीत, तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने शंका उपस्थित करत आहेत. आता त्यांनी आणखी एक शंका उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. मिटकरींनी विमानाच्या ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे कि ब्लॅक बॉक्स हा उच्च तापमानातही वितळत किंवा जळत नाही.
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या शेपटीमध्ये असतो. त्यामुळे अपघात झाल्यानंतरही विमानाची शेपटी पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटीमध्ये ठेवला जातो. अपघात झालेल्या त्या विमानाची शेपटी अजिबात जळालेली नाही. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?, असा सवाल मिटकरी यांनी ट्विटमध्ये विचारला आहे.
अपघातानंतर लागलेली आग जर ११००°सी पेक्षा जास्त असेल किंवा ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक खराब होऊ शकतात. ३,४०० जीएसपेक्षा जास्त धक्का बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते. खोल समुद्रात दीर्घकाळ पाण्यात राहिल्यास गंज होऊ शकतो आणि त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, ब्लॅक बॉक्स ३० दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असतो, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण येत आहे. त्यामुळे आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजते. आम्ही वाट पाहू पण तोवर विमानतळावरील ब्ब्ज्ट फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या गाडीत निघाले, कोणत्या रोडवर ट्रॅफिक मध्ये अडकले, त्या ठिकाणचे बबजअ फुटेज व सर्व या पायलटचा २८ जानेवारी २०२६ चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
यापूर्वी देखील मिटकरींनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले होते. हे विमान एक वर्षापासून तांत्रिक बिघाडामुळे बंदीमध्ये होतं, तरी अजित पवारांना दिलं गेलं. पायलट दोनदा बदलले गेले. शेवटच्या पायलटला मारुन ५० कोटींच्या विमा रकमेच्या आमिषासाठी प्रवृत्त केलं गेलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला. आपत्कालीन स्थितीत ‘मे-डे’ कॉल का आला नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. अपघातानंतर मृतदेह जळाले पण कागदपत्रे जळाली नाहीत. विमानात ६ जण होते असं सांगितलं गेलं, पण फक्त ५ मृतदेह सापडले. दरम्यान ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर मिटकरींचा संशय आणखी बळावला आहे.
टीव्ही ९ मराठीच्या वृत्तानुसार, या प्रकरणात संरक्षण तज्ज्ञांनी वेगळाच दावा केला आहे. लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे यांनी म्हटले आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा करप्ट झाल्याचा जर दावा केला जात असेल तर नक्कीच या अपघातामागं काहीतरी काळंबेरं असण्याचे प्रथमदर्शनी वाटते. कारण ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठिकाणी असतो, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही अशी व्यवस्था संबंधित विमानात केलेली असते.




