बीड – माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नागपूरच्या महिलेचा फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पून्हा वाढणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नागपुरच्या एका महिलेने मोठे गंभीर व आर्थिक फसवणूकीचे आरोप केले आहेत. नागपूरमधील एका महिलेने खळबळजनक आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले आहेत. या नागपूरच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एक फसवणुकीचा आरोप झाल्यामूळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. आता मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले आहेत.
नागपूरमधील एका महिलेने आता धनंजय मुंडे यांच्यावर खूप गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रंजना नागपूरकर या महिलेने यांनी धनंजय मुंडे, कैलास फड आणि निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. रंजना नागपूरकर या महिलेच्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी पैसे मागितले होते. रंजना नागपूरकर म्हणाल्या की, मी एकूण १७ लाख तत्कालीन मंत्री धनंजय मूंडे यांना दिले आहेत. प्रथम बीड जिल्ह्यातील परळीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी गेल्या तेव्हा मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, आता जा, तुमचे काम आता पूर्ण झाले आहे. पण नंतर ना पतीची नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले असे रंजना नागपूरकर म्हणाल्या आहेत.
रंजना नागपूरकर म्हणाल्या की, मी परळीत पैसे परत मागितल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी पुन्हा पैसे मागायला बीडमधील परळीतील घरात गेले. तेव्हा तिथे धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्यासोबत मुंडे यांच्या पत्नी आणि आईही उपस्थित होत्या. त्यावेळी मुंडे यांच्यासमोरच माझ्या मानेवर पिस्तूल लावून भीती घातली आहे. असा खळबळजनक आरोप रंजना नागपूरकर यांनी केला आहे. तर तू पुन्हा आलीस तर तुला गाडून टाकू, कुणालाही कळणारही नाही, अशी धमकी मला देण्यात आली होती. या धमकीनंतर रंजना नागपूरकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर जाणे बंद केले होते, असे रंजना नागपूरकर म्हणाल्या आहेत.
18 फेबु्रवारी 2026 रोजी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या घरी रंजना नागपूरकर रडत-रडत आल्या होत्या. मंत्री धनंजय मुंडे यांच्या मानसिक छळामुळे रंजनाताईं नागपूरकर यांच्या पतीचा मृत्यू झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आणखी २२ हून अधिक तक्रारी असल्याचे ही उघड केले आहे. आणि शहाणा हो, माझ्याशी पंगा घेऊ नकोस, असा इशारा मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे.
तर या नवीन आर्थिक फसवणूक प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवडे यांनी हे आरोप पूर्णपणे चूकीचे आहेत, असे म्हणाले आहेत. ते म्हणतात, महाराष्ट्रात अनेक लोक मंत्री धनंजय मुंडेचे नाव घेऊन स्वतःचा धंदा चालवतात. पैसे दिले असतील तर ते मंत्री धनंजय मुंडे यांना दिले नाहीत. रंजनाताई नागपूरकर तुम्ही बीडला या, आम्ही सत्य तपासू. असे मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवडे यांनी म्हटले आहे.
राज्यातील हे नवीन आर्थिक फसवणूक प्रकरण मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी नवीन अडचण निर्माण करणार आहे. रंजना नागपूरकर यांच्या रडण्याने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्याने हे प्रकरण वाढले आहे. या गंभीर प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत.आहे. राज्यातील मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एका राजकीय वादात सापडले आहेत. याप्रकरणात नागपूरच्या महिलेच्या आर्थिक नुकसान व फसवणूक प्रकरणामूळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.




