नवी दिल्ली – दिल्ली सरकारने रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दारुची दुकाने बंद ठेवून मुस्लिमांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करावा अशी मागणी दिल्लीमधील एआयएमआयएमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष डॉ. शोएब जमई यांनी केली आहे. दिल्लीमध्ये २० मार्च २०२६ पर्यंत सर्व दारुची दुकानं बंद ठेवावीत. दिल्लीतील ओवेसींच्या पक्षाने ही मागणी केली आहे. देशात हिंदूसाठी सर्वात पवित्र महिना असलेला श्रावणाचा उल्लेख करत असदुद्दीन ओवेसींच्या पक्षाने राज्य सरकारकडे मद्यविक्री बंद ठेवण्याची मागणी केली आहे. देशातील श्रावण महिन्याचा संदर्भ देत देशातील मूस्लिमांच्याही धार्मिक भावनांचा सन्मान करावा ही दिल्ली सरकारची जबाबदारी आहे. असे एआयएमआयएमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष डॉ. शोएब जमई यांनी म्हटले आहे.
इस्लाममधील रमजानचा महिना आजपासून सुरु झाला आहे. असे असतानाच एआयएमआयएमने दिल्ली राज्य सरकारकडे मागणी केली आहे. ही मागणी दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. दिल्लीमधील एआयएमआयएमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष डॉ. शोएब जमई यांनी दिल्ली सरकारकडे रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये सर्व दारुची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी केली आहे. दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यविक्री बंद करण्यात यावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. एमआयएमचे शोएब जमई यांनी देशातील श्रावण महिन्याचे उदाहरण दिले आहे.
श्रावण महिन्याचा उल्लेख करताना दिल्ली सरकारकडे शोएब जमई यांनी, श्रावणामध्ये मांस विक्री करणारी दुकाने बंद ठेवली जातात. या भावनेचा सन्मान केला जावा अशी अपेक्षा असते. असे असल्याने आता देशात मुस्लिमांच्या पवित्र महिन्यामध्येही त्यांच्या धार्मिेक भावनांचा सन्मान केला जावा. धार्मिक भावनांचा सन्मान करत दिल्ली सरकारने रमजानमध्ये मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना २० मार्च २०२६ पर्यत बंद ठेवावे असे एमआयएमचे डॉ.शोएब जमई यांनी म्हटले आहे. डॉ. शोएब जमई यांनी आपली मागणी करताना देशातील मूस्लिमांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. दिल्ली सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पवित्र महिन्यांमध्ये धार्मिक भावनांचा सन्मान राखण्याची जबाबदारी दिल्ली सरकारची आहे, असे एमआयएमचे डॉ. शोएब जमई यांनी म्हटले आहे. दिल्लीत रमजानच्या काळात दुकाने बंद राहिल्यास रमजानचे पावित्र्य टिकून राहील, असे एमआयएमचे डॉ. शोएब जमई म्हणाले आहेत. डॉ. शोएब जमई यांनी रमजानमध्ये मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी करणारी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आमची दिल्ली सरकारकडे मागणी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये दिल्लीमध्येही मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत. सार्वजनिक ठिकाणी मद्यविक्रीवर बंदी घालावी. तुम्ही श्रावण महिन्यात मांसाहाराची दुकाने बंद ठेऊन सन्मान आणि धार्मिक भावना जपू शकता तर, देशात आमच्या पवित्र रमजान महिन्याचाही सन्मान केला पाहिजे, असे एमआयएमचे डॉ. शोएब जमई यांनी म्हटले आहे.




