देशातील लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी मदत केली हा इतिहास पाहण्याची गरज आहे

SHARE:

कोल्हापूर – देशातील लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी मदत केली हा इतिहास पाहण्याची गरज आहे, असे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज म्हणाले आहेत. मालेगाव महानगर पालिकेच्या उपमहापौर यांच्या कार्यालयात लागलेल्या टिपू सुलतान फोटोचा वाद आता राज्यभरात पोहोचला आहे. यावर आता काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मालेगावच्या उपमहापौर यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लागला यानंतर महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी याप्रकरणावर वादग्रस्त विधान केले होते, असे राज्यातील भारतीय जनता पार्टीचे म्हणणे होते.

यानंतर भाजपने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने करुन निषेध नोंदवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचे आहे, त्यांनी स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने विचार नेला आहे, अगदी त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले आहेत. अर्थात भूमीपुत्र होऊन गेले आहेत त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विचारांना जवळ केले नाही. एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यायसारखेच मानले पाहिजे असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते.

या प्रकरणावर मालेगावमधील इस्लाम पार्टीचे असिफ शेख यांच्याकडून पाठराखण केली आहे. टिपू सुलतान आणि औरंगजेब हे विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांना विरोध करता का ? असा प्रश्न इस्लाम पार्टीचे असिफ शेख यांनी उपस्थित केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अभ्यास करूनच स्टेटमेंट दिले असेल तर, काय हरकत काय आहे. असे म्हणत असिफ शेख यांनी सकपाळ यांची एकप्रकारे बाजू मांडली होती. मालेगावात महापौर आणि उपमहापौर कार्यालयात काही नगरसेवकांनी टिपू सुलतानचा फोटो लावला होता. या फोटावरुन वाद सुरू झाला होता टिपू सुलतानचा वाद कधीपासून सुरू आहे.

तुम्ही संविधानाला मिटवू शकता का? भारतीय जनता पार्टी आणि जातीयवादी संघटना आंदोलन करतात ते संविधानाला मिटवतील का? ब्रिटिश काळात टिपू सुलतान हे इंग्रजांच्या विरोधात लढले होते. हे मी सांगत नाही ते संविधानात लिहिले आहे. संविधानात स्पष्ट लिहिले आहे , असे इस्लाम पार्टीचे आसिफ शेख म्हणाले आहेत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपले काम करायचे ठरवले असेल, असे काँग्रेस खासदार शाहू महाराज यांनी म्हटले आहे.

त्याचवेळी आपण भारत देशातील लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हा इतिहास देखील पाहण्याची गरज आहे असे शाहू महाराज म्हटले आहे. खरेतर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार आपण लक्षात घेतले पाहिजेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी काय करावे लागेल हे, त्यातून लक्षात येऊ शकते असे शाहू महाराज म्हणाले आहेत. कोल्हापुरात शिवछत्रपती यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाहू महाराज यांनी बोलत होते.

Leave a Comment

अधिक वाचा