मुंबई – राज्यात २० फेब्रुवारी २०२६ पासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे, तर राज्यातील १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. राज्यात शुक्रवार पासून दहावीची परीक्षा सूरू होणार आहे. तर राज्यातील १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतली जाणारी दहावीची बोर्डाची परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही दहावीची परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून सूरू होणार आहे. तर शेवटचा पेपर बुधवार १८ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
राज्यातील दहावीची बोर्डाची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतली जाणार आहे. राज्यातील या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुले तर, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ तृतीयपंथी दहावीची बोर्डाची परिक्षा देणार आहेत. यावर्षीच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑनलाईन वेबसाईटवर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्यो वेळापत्रकानुसार ही परीक्षा होणार आहे.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून नोंदणी पूर्ण झाली आहे. आणि राज्यभरातील ५,११९ केंद्रांवर दहावीची बोर्डाची परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यात यूडीआयएसई डेटाबेस वापरून ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. राज्यातील दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेसाठी १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले आहेत. तर महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात आले आहे. राज्यातील दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत मदत पुरवण्यासाठी २० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील दहावीच्या परिक्षेसाठी नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आली आहे. राज्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत संभाव्य कापीचे गैरप्रकार रोखण्यासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरात २७१ भरारी पथके तयार केली आहेत.
राज्यातील विभागीय स्तरावर विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्यांना आणि जिल्हास्तरीय सरकारी अधिकाऱ्यांना दहावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सीसीटीव्हीने सुसज्ज असलेल्या सर्व केंद्रांवरील दहावीच्या परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली घेतल्या जाणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या दहावीच्या परीक्षा केंद्रांवर नियोजीत परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी पाहोचणे गरजेचे आहे. सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. दहावीच्या परिक्षेची हॉल तिकिटे शाळेच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन उपलब्ध केलेली आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त १० मिनिटे दिली जाणार आहेत. राज्यातील दिव्यांग उमेदवारांसाठी सवलती दिल्या आहेत. राज्यातील काही जण वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे दिलेल्या कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यांकन किंवा समकक्ष दहावीच्या परीक्षांना उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांना २० , २३ आणि २४ मार्च २०२६ रोजी उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे. राज्यातील परिवहन महामंडह एसटी बस सेवा राज्यातील दहावीच्या परीक्षेसाठी वेळेवर बस सुविधा देणार आहे. आणि राज्यातील वीज वितरण कंपनी यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहे, असे राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे.





