नवी दिल्ली – देशात ३२ बनावट विद्यापीठांचे मोठे जाळे पसरले आहे, तर देशभरात बनावट विद्यापीठांची संख्या २० वरून ३२ झाली आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे. देशात ३२ बनावट विद्यापीठांचे जाळे वाढत चालले आहे, यासंदर्भात यूजीसीने सावधानतेचा इशारा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशात वाढत चाललेल्या बनावट विद्यापीठांच्या जाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. भारत देशात२ वर्षांपूर्वी देशाच्या 8 राज्यांमध्ये बनावट विद्यापीठे होती.
त्यात आता वाढ होऊन आता देशभरातील १२ राज्यात शिक्षण माफिया पोहोचले आहेत. तर देशातील बनावट विद्यापीठांची संख्या २० वरून ३२ झाल्याचे यूजीसीने सांगितले आहे. यूजीसीने देशभरातील विद्यार्थी व पालकांना म्हटले आहे की, देशातील अशा बोगस संस्थांमध्ये कधीही प्रवेश घेऊ नये. बेंगळुरू, कर्नाटक येथील ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी नावाच्या बनावट संस्थेच्यामूळे हा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यूजीसीच्या वेबसाईटवर देशातील बनावट विद्यापीठांची पूर्ण यादी उपलब्ध केली आहे.
तरी देशभरातील मूलांनी प्रवेश घेण्यापूर्वी ती विद्यापीठाची यादी नक्की तपासावी, असेही युजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशात बनावट विद्यापीठे शिक्षणक्षेत्रात गावोगावी आपले जाळे पसरवत आहेत. आणि दरवर्षी देशातील हजारो विद्यार्थ्यांना फसवत आहेत. देशातील ३२ बोगस विद्यापीठांपैकी दिल्लीमध्ये १२ विद्यापीठे आहेत, काही संस्था तर यूजीसीच्या कार्यालयापासून फक्त काही अंतरावर आहेत. देशभरात दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड या राज्यांमध्ये प्रामुख्याने ही बनावट विद्यापीठे स्थापन केलेली आहेत.
भारत देशात विदेशी विद्यापीठांच्या नावाखाली बोगस बनावट शिक्षण संस्थांनी जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वीच श्रीलंकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने यूजीसीकडे पत्र पाठवून महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या बोगस विद्यापीठाविरुद्ध तक्रार केली होती.
देशातील सर्व विद्यार्थ्यांनी सतर्क राहून यूजीसीच्या अधिकृत यादीत नोंदली गेलेली विद्यापीठे निवडावी, अन्यथा भविष्यात शिक्षण आणि करिअरवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा भारतातील तज्ज्ञांनी दिला आहे. व युजीसीने सर्व देशभरातील विद्यार्थ्याना व पालकांना बनावट विद्यापीठापासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.





