चंदीगड – आयडीएफसी फर्स्ट बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. चंदीगडमधील फर्स्ट बँकेत ५९० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाला आहे. कर्मचाऱ्यांनीच निधीचा गैरवापर केला आहे. या घटनेमूळे देशभरातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. चंदीगडमधील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या एका प्रमुख शाखेत कोट्यावधी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेने अधिकृतपणे कबूल केले आहे की, या शाखेत ५९० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाला आहे.
हा संपूर्ण आर्थिक घोटाळा थेट हरियाणा सरकारच्या खात्यांशी जोडलेला आहे. ५९० कोटी रुपयांचा हा मोठा घोटाळा कोणत्याही तपास यंत्रणेने उघड केला नाही, तर एका सामान्य प्रक्रियेत उघड झाला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शाखेत ५९० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तपासानुसार, काही बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवहार केले आहेत.
हा मोठा आर्थिक फसवणुकीचा घोटाळा समोर आल्यानंतर देशातील बँक प्रशासन सावध झाले आहे. १८ फेब्रुवारी २०२६ पासून, हरियाणा सरकारशी संलग्न असलेल्या अनेक संस्थांनी चंदीगड मधील या बँकेच्या शाखेशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट त्यांचे अधिकृत खाते बंद करणे आणि तिथे जमा केलेले सर्व निधी दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करणे हे होते. ही एक नियमित प्रक्रिया होती, परंतु कागदपत्रांची प्रक्रिया जसजशी पुढे सरकत गेली तसतसे एक मोठी तफावत दिसून आली आहे.
सरकारने नोंदवलेली शिल्लक आणि बँकेच्या प्रणालीतील प्रत्यक्ष शिल्लक यामध्ये एक महत्त्वाची तफावत दिसून आली आहे. पैसे तिथे सुरक्षित नव्हते. कागदपत्रे आणि वास्तवातील या तफावतीमुळे घोटाळ्याचा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. या घटनेत घोटाळ्याची माहिती मिळताच आयडीएफसी फर्स्ट बँक व्यवस्थापनान कडक कारवाई केली आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी म्हणून, चंदीगड शाखेतील ४ संशयित अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम राहील असे आयडीएफसी फर्स्ट बँकेने जाहीर केले आहे. बँक व्यवस्थापनाने असे स्पष्ट केले आहे की, या आर्थिक फसवणुकीत सहभागी असलेल्या कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा बाहेरील व्यक्तीला सोडले जाणार नाही. कायद्यांनुसार त्यांच्याविरुद्ध कडक शिस्तभंगाची, दिवाणी आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. चंदीगडमधील स्थानिक पोलिस प्रशासनाकडे औपचारिक तक्रार देखील दाखल केली आहे.
हे पैसे हस्तांतरित केले आहेत, तिथे बँकेने इतर बँकांना देखील सावधानता बाळगण्यास यांगितली आहे. पुढील हस्तांतरण रोखण्यासाठी या संशयास्पद खात्यांमधील शिल्लक ताब्यात घेण्याची विनंती बँकेने केली आहे. या फर्स्ट बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक फसवणूक करणार्या लोकांना सोडले जाणार नाही, असे बँक व्यवस्थापनाने म्हटले आहे.




