पुण्यात मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड, २२ महिलांना अटक

SHARE:

पुणे – पुण्यात मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. तर या प्रकरणात २२  महिलांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात मोठ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. तर बांग्लादेशी महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दलालाला अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील बुधवार पेठेत एक वेश्या व्यवसाय दलाल पापा शेख गेल्या २० वर्षांपासून राहत आहे. पापा शेख या दलालाचे नाव वेश्या व्यवसायात दबदब्याने घेतले जाते. हॉटेलमध्ये छोटी-मोठी कामे करणारा पापा शेख एका कामगारापासून तो अनैतिक व्यापाराचा मोठा दलाल बनला आहे.

गेल्या दोन दशकांपासून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून बांगलादेश ते पुणे अशी वेश्या व्यवसायाच्या तस्करीची साखळी चालवणाऱ्या या बाबू भैय्या नावाच्या दलालाचे गुपित आता उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी एका मोठ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी काही दिवसांपुर्वी मोहीम राबवली होती. या पुणे पोलिसांच्या कडक कारवाईत पोलिसांनी २२ महिलांना अटक केले आहे. ज्यांची पुणे पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे.

त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील ११ महिला या मूळच्या बांग्लादेशी नागरिक आहेत, अशी माहिती मिळाली आहे. यापूर्वी पुण्यातील बुधवार पेठ परिसरात टाकलेल्या २  धाडीमध्ये १०  बांग्लादेशी नागरिक सापडले होते. या महिलांकडे भारतीय बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर ओळखपत्रे सापडली आहेत. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणात मानव तस्करी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड दलाल बाबू भैय्या उर्फ पापा शेख असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या तपासात ही घटना उघडकीस आली आहे. दलाल बाबू भैय्या उर्फ पापा शेख हा गेल्या २० वर्षांपासून पुणे शहरात राहत आहे. सुरुवातीच्या काळात तो एका किरकोळ कामे करायचा, पण तिथूनच तो पुणे शहरातील वेश्या व्यवसायातील मोठा दलाल बनला आहे. कोलकात्यामार्गे अनेक बांग्लादेशी महिलांना पुण्यात आणून त्याने वेश्या व्यवसायात ढकलले आहे.

आणि पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. पापा शेख या दलालाने 3 लग्ने केली आहेत. त्याची एक पत्नी बांगलादेशी आहे. त्याच्या तीनही पत्नी बुधवार पेठेत बांग्लादेशी महिलांचे शोषण करत आपली दहशत वाढवत होत्या. बांगलादेशी पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता अशी पुणे पोलिसांना माहिती कळाली होती. या प्रकरणात जर एखाद्या बांग्लादेशी महिलेने या या वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर तिला बेदम मारहाण केली जात असे, अशी माहिती पुणे पोलीसांच्या तपासात मिळाली आहे.

हे पुण्यातील वेश्या व्यवसाय रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते. पापा शेख नावाचा हा आरोपी बांग्लादेशी महिलांना ब्युटी पार्लरमध्ये नोकरी किंवा शिलाई कामाचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणत होता. व पुण्यात आणल्यानंतर त्यांना पैशांचे आमिष दाखवून किंवा धाक दडपशाही करून बांग्लादेशी महिलांना वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. या बांग्लादेशी महिलांच्या कमाईतील मोठा हिस्सा हा दलाल पापा शेख आणि त्याची टोळी स्वतःकडे ठेवत असे.

या प्रकरणात दलाल पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावर पूणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या मुख्य सूत्रधार पापा शेख पळून गेला आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुणे शहरातील फरासखाना आणि खडक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या ११ महिलांना पुन्हा त्यांच्या देशात म्हणजेच बांग्लादेशात पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

पुण्यातील या वेश्या व्यवसाय रॅकेटमध्ये बांग्लादेश सीमेवरून बोगस कागदपत्रे तयार करून देणारे दलाल कोण आहेत, याचा शोध आता पुणे पोलीस करत आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे शहरातील बुधवार पेठेत अशा प्रकारच्या कारवाया वाढल्या आहेत. पुणे शहरातील मानवी तस्करीचे हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तोडण्यासाठी पुणे पोलिसांनी ही कडक कारवाई केली आहे. तर या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा