अमरावतीमध्ये निरोप समारंभाच्या पार्टीत कॉलेजच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

SHARE:

 अमरावती – निरोप समारंभाच्या पार्टीत कॉलेजच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आले आहेत. गुंगीचे औषध देऊन दोन भावांकडून एका कॉलेजच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणात या विद्यार्थिनीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एका कॉलेजच्या निरोप समारंभाच्या पार्टीत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.कॉलेज विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार २६ मे २०२५ रोजी रहाटगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉलजेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाची पार्टी आयोजित केली होती.

या पार्टीत चेतन आणि आकाश ते दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. चेतन नावाच्या तरूणाने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील पीडित विद्यार्थिनीला या पार्टीसाठी बोलावले होते. पार्टी सुरु असताना पीडितेच्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले होते. ज्युस पिल्यानंतर ती पीडित विद्यार्थिनी बेशुद्ध झाली होती. यानंतर आरोपी चेतन अंबाडकर याने हॉटेलमधील एका खोलीत पीडितेवर अत्याचार केला होता, असा आरोप या दोन आरोपींवर करण्यात आला आहे.

या प्रकरणात या दोन तरूणांनी पीडित विद्यार्थिनीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले होते. ते अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन्ही आरोपी अत्याचार करत होते, व त्या पीडित विद्यार्थिनीला ५ लाखांची मागणी करत होते. हे आरोपी विद्यार्थिनीला वारंवार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होते. या धमकीच्या भीतीने तिच्यावर सतत अत्याचार केले आहेत. गेल्या ७  ते ८  महिन्यांपासून हे आरोपी विद्यार्थिनीला धमकी देत होते, छळ करत होते.

या अत्याचाराला व धमकीला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीने धाडस करून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांमध्ये दोन्ही आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. अमरावती पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील तपास अमरावती पोलिसांनी सुरू केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा